मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sports Award : अर्जुन पुरस्कारासाठी शमी, तर खेलरत्नसाठी या दोन खेळाडूंना नामांकन, पाहा

Sports Award : अर्जुन पुरस्कारासाठी शमी, तर खेलरत्नसाठी या दोन खेळाडूंना नामांकन, पाहा

Dec 14, 2023, 02:54 PM IST

    • Indian Sports Award : बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयाकडे शमीच्या नावाची शिफारस केली आहे. कारण मूळतः शमीचे नाव देशातील दुसऱ्या क्रमांकाचा क्रीडा पुरस्कार अर्जुन पुरस्काराच्या यादीत नव्हते.
Arjuna Award For Mohammed Shami (PTI)

Indian Sports Award : बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयाकडे शमीच्या नावाची शिफारस केली आहे. कारण मूळतः शमीचे नाव देशातील दुसऱ्या क्रमांकाचा क्रीडा पुरस्कार अर्जुन पुरस्काराच्या यादीत नव्हते.

    • Indian Sports Award : बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयाकडे शमीच्या नावाची शिफारस केली आहे. कारण मूळतः शमीचे नाव देशातील दुसऱ्या क्रमांकाचा क्रीडा पुरस्कार अर्जुन पुरस्काराच्या यादीत नव्हते.

Arjuna Award For Mohammed Shami : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवले आहे. विश्वचषकातील चमकदार कामगिरीनंतर शमीच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. शमीने वर्ल्डकपच्या केवळ ७ सामन्यांत सर्वाधिक २४ बळी घेतले होते.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

तर बॅडमिंटनपटू आणि सुपरहिट जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयाकडे शमीच्या नावाची शिफारस केली आहे. कारण मूळतः शमीचे नाव देशातील दुसऱ्या क्रमांकाचा क्रीडा पुरस्कार अर्जुन पुरस्काराच्या यादीत नव्हते.

अर्जुन पुरस्कारासाठी १७ खेळाडूंना नामांकन

शमीशिवाय अन्य १६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. यामध्ये पुरुष हॉकीपटू कृष्णा बहादूर पाठक आणि सुशीला चानू, तिरंदाज ओजस प्रवीण देवतळे आणि अदिती गोपीचंद स्वामी, बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दीन, बुद्धिबळपटू आर वैशाली, गोल्फपटू दीक्षा डागर, नेमबाज ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, कुस्तीपटू अनंत पंघळे यांचा समावेश आहे.

शिवेंद्र सिंह यांना द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकन

द्रोणाचार्य पुरस्कारासाठी ५ जणांना नामांकन मिळाले आहे. यामध्ये गणेश प्रभाकरन (मल्लखांब), महावीर सैनी (पॅरा अॅथलेटिक्स), ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ) आणि शिवेंद्र सिंग (हॉकी) यांचा समावेश आहे. कविता (कबड्डी), मंजुषा कंवर (बॅडमिंटन) आणि विनीत कुमार शर्मा (हॉकी) यांना मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकित खेळाडू:

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (बॅडमिंटन).

अर्जुन पुरस्कारः   

मोहम्मद शमी (क्रिकेट), अजय रेड्डी (दृष्टीहीन क्रिकेट), ओजस प्रवीण देवतळे आणि आदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), पारुल चौधरी आणि एम श्रीशंकर (अॅथलेटिक्स), मोहम्मद हुसमुद्दीन (बॉक्सिंग), आर. वैशाली (बुद्धिबळ),

यानंतर दिव्यकृती सिंग आणि अनुष अग्रवाल (अश्वस्वार), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्णा बहादूर पाठक आणि सुशीला चानू (हॉकी), पिंकी (लॉन बॉल), ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर (नेमबाजी), आनंद पंघल (कुस्ती), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस) 

ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार

कविता (कबड्डी), मंजुषा कंवर (बॅडमिंटन), विनीत कुमार शर्मा (हॉकी).

द्रोणाचार्य पुरस्कार

गणेश प्रभाकरन (मल्लखांब), महावीर सैनी (पॅरा अॅथलेटिक्स), ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), शिवेंद्र सिंग (हॉकी).

पुढील बातम्या