मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Football : ३-४ खेळाडूंना एकटाच भिडायचा हा भारतीय फुटबॉलर, पेलेनंही केलं होतं कौतुक

Football : ३-४ खेळाडूंना एकटाच भिडायचा हा भारतीय फुटबॉलर, पेलेनंही केलं होतं कौतुक

Aug 17, 2023, 03:06 PM IST

    • indian footballer Mohammed Habib Passes Away : भारताचे दिग्गज फुटबॉलपटू मोहम्मद हबीब यांचे मंगळवारी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. महान पेले यांनीही ७० च्या दशकातील या दिग्गज फुटबॉलपटूचे कौतुक केले आहे. हबीबी यांना त्यांच्या चपळ फूटवर्कसाठी  भारताचा पेले असेही म्हटले जायचे.
indian footballer Mohammed Habib Passes Away

indian footballer Mohammed Habib Passes Away : भारताचे दिग्गज फुटबॉलपटू मोहम्मद हबीब यांचे मंगळवारी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. महान पेले यांनीही ७० च्या दशकातील या दिग्गज फुटबॉलपटूचे कौतुक केले आहे. हबीबी यांना त्यांच्या चपळ फूटवर्कसाठी भारताचा पेले असेही म्हटले जायचे.

    • indian footballer Mohammed Habib Passes Away : भारताचे दिग्गज फुटबॉलपटू मोहम्मद हबीब यांचे मंगळवारी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. महान पेले यांनीही ७० च्या दशकातील या दिग्गज फुटबॉलपटूचे कौतुक केले आहे. हबीबी यांना त्यांच्या चपळ फूटवर्कसाठी  भारताचा पेले असेही म्हटले जायचे.

क्रीडा विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली. भारताचे दिग्गज फुटबॉलपटू मोहम्मद हबीब यांचे मंगळवारी (१५ ऑगस्ट) निधन झाले. महान पेले यांना टक्कर देणारे हबीब ७४ वर्षांचे होते. हैदराबाद शहरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हबीब यांच्या निधनामुळे क्रीडा जगत हळहळले आहे. हबीब हे ७० च्या दशकातील एक महान भारतीय फुटबॉलपटू होते आणि त्यांच्याकडे विरोधी संघातील ३-४ खेळाडूंचा एकहाती सामना करण्याची क्षमता होती.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

१९७५ पर्यंत ते आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळले. क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अर्जुन पुरस्कारही देण्यात आला. हबीब मोहन बागानकडून खेळायचे. या क्लबचा पेलेच्या न्यूयॉर्क कॉसमॉस विरुद्ध सामना झाला, त्या सामन्यात मोहम्मद हबीबने एक शानदार गोल केला होता.

हबीब यांचे ३५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ११ गोल

१७ जुलै १९४९ रोजी जन्मलेले भारताचे माजी कर्णधार हबीब यांनी देशासाठी ३५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी दमदार पद्धतीने ११ गोल केले. हबीब यांनी हल्दिया येथील फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडिया अकादमीचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.

लेजेंड हबीब गंभीर आजाराशी झुंज देत होते

हबीब हे स्मृतिभ्रंश आणि पार्किन्सन्स या आजाराशी झुंज देत होते. हबीब यांनी हैदराबादमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे.

बँकॉक येथे १९७० च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या संघाचेही ते सदस्य होते. हबीब मोहन बागान, ईस्ट बंगाल आणि मोहम्मडन स्पोर्टिंगकडून खेळले आहेत. पुढे ते टाटा फुटबॉल अकादमीचे प्रशिक्षकही झाले.

पेले यांनीही केले होते हबीब यांचे कौतुक 

हबीब यांनी हल्दिया येथील फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडिया अकादमीचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केले. हबीब यांनी पेलेच्या कॉसमॉस क्लबविरुद्ध १९७७  मध्ये इडन गार्डन्सवर पावसात झालेल्या सामन्यात गोल केला होता. त्या संघात पेले, कार्लोस अल्बर्टो, जॉर्जिओ सी असे दिग्गज होते. तो सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता. सामना संपल्यानंतर पेले यांनी मोहम्मद हबीब यांचे कौतुक केले होते.

एकट्याने ३-४ खेळाडूंना भिाडायचे

मोहम्मद हबीब यांच्याकडे गोल करण्यापूर्वी तीन-चार खेळाडूंना चकमा देण्याची अद्भुत क्षमता होती. ते आक्रमक मिडफिल्डर होते. त्यांच्याकडे वेगवान आणि ड्रिब्लिंगचे कौशल्य असल्याने ते पुढे होऊन खेळण्यास सक्षम होते. मोहम्मद हबीब यांना त्यांच्या चपळतेमुळे छोटा पेले या नावानेही चाहते ओळखायचे. 

कोलकातामध्ये मिळाला मान सन्मान

हैदराबादच्या टोळीचौकीत राहणारे हबीब हे तेथे विस्मृतीत गेलेल्या हिरोसारखे होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी हसतमुखाने सांगितले होते, 'मला येथे कोणी ओळखत नाही.' पण याउलट हबीब यांना कोलकात्यात खूप मान सन्मान मिळाला. कोलकात्यात चाहते त्यांची पुजा करायचे. 

पुढील बातम्या