मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mithali Raj WPL 2023 : मिताली राज अदानींच्या संघात, गुजरात जायंट्सनं दिली सर्वात मोठी जबाबदारी

Mithali Raj WPL 2023 : मिताली राज अदानींच्या संघात, गुजरात जायंट्सनं दिली सर्वात मोठी जबाबदारी

Jan 28, 2023, 10:38 PM IST

    • Mithali Raj Gujarat Giants WPL 2023 : महिला आयपीएल यंदा सुरू होत आहे. या स्पर्धेला महिला प्रीमियर लीग (WPL) असे नाव देण्यात आले आहे. महिलांची आयपीएल यंदा मार्चमध्ये खेळवली जाऊ शकते.
Mithali Raj WPL 2023

Mithali Raj Gujarat Giants WPL 2023 : महिला आयपीएल यंदा सुरू होत आहे. या स्पर्धेला महिला प्रीमियर लीग (WPL) असे नाव देण्यात आले आहे. महिलांची आयपीएल यंदा मार्चमध्ये खेळवली जाऊ शकते.

    • Mithali Raj Gujarat Giants WPL 2023 : महिला आयपीएल यंदा सुरू होत आहे. या स्पर्धेला महिला प्रीमियर लीग (WPL) असे नाव देण्यात आले आहे. महिलांची आयपीएल यंदा मार्चमध्ये खेळवली जाऊ शकते.

Mithali Raj Gujarat Giants MENTOR : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राची तयारी सुरू झाली आहे. लीगचे पाचही संघ यासाठी सज्ज झाले आहेत. अलीकडेच दिल्लीने झुलन गोस्वामीला गोलंदाजी प्रशिक्षक बनण्याची ऑफर दिली आहे. त्याचवेळी गुजरातनेही या दिशेने काम सुरू केल्याची बातमी आली आहे. एका वृत्तानुसार, गुजरातने मिताली राजची मेंटॉर म्हणून निवड केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

खरं तर, अदानी समूहाने सर्वात मोठी बोली लावून (१२८९ कोटी) वुमन्स प्रीमियर लीगमधील अहमदाबाद संघ विकत घेतला. क्रिकबझच्या वृत्तानुसार, अहमदाबाद (गुजरात) संघाने भारताची माजी कर्णधार मिताली राजची मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून निवड केली आहे. वृत्तानुसार, महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम मार्चमध्ये सुरू होणार आहे. ४ मार्चपासून ही स्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे.

मिताली राजने महिला प्रीमियर लीगवर प्रतिक्रिया दिली आहे. रिपोर्टनुसार, मिताली म्हणाली की, "महिला प्रीमियर लीगचा पहिला सीझन महिला क्रिकेटसाठी फायदेशीर ठरेल." अदानी ग्रुपचे हे पाऊल खेळाला पुढे नेणार आहे. मितालीबाबत अदानी एंटरप्रायझेसचे संचालक प्रणव अदानी म्हणाले, "मिताली राज ही नवीन पिढीसाठी एक आदर्श आहे. अशी खेळाडू आमच्या महिला संघाची मार्गदर्शक आहे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे'.

मिताली राजची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

विशेष म्हणजे मिताली राजची आंतरराष्ट्रीय कारकीर्द नेत्रदीपक राहिली आहे. तिने २११ एकदिवसीय डावात ७८०५ धावा केल्या आहेत. मितालीने यादरम्यान ७ शतके आणि ६४ अर्धशतके झळकावली आहेत. तिने १२ कसोटी सामनेही खेळले आहेत. यामध्ये तिने ६९९ धावा केल्या आहेत. मितालीने ८९ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २३६४ धावा केल्या आहेत. यामध्ये तिने १७ अर्धशतके झळकावली आहेत. मितालीने वनडे फॉरमॅटमध्ये ८ विकेट्सदेखील घेतल्या आहेत.

पुढील बातम्या