मराठी बातम्या  /  क्रीडा  /  LLC 2022: मिचेल जॉन्सन-यूसुफ पठाण यांच्यात जोरदार राडा, धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल

LLC 2022: मिचेल जॉन्सन-यूसुफ पठाण यांच्यात जोरदार राडा, धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल

Oct 03, 2022, 01:46 PM IST

    • mitchell johnson & yusuf pathan fight: लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत युसूफ पठाण आणि मिचेल जॉन्सन यांच्यात जोरदार राडा झाला आहे. वाद नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. मात्र, दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.
yusuf pathan & mitchell johnson fight

mitchell johnson & yusuf pathan fight: लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत युसूफ पठाण आणि मिचेल जॉन्सन यांच्यात जोरदार राडा झाला आहे. वाद नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. मात्र, दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

    • mitchell johnson & yusuf pathan fight: लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत युसूफ पठाण आणि मिचेल जॉन्सन यांच्यात जोरदार राडा झाला आहे. वाद नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. मात्र, दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना इंडिया कॅपिटल्स आणि भिलवाडा किंग्ज यांच्यात जोधपूरमध्ये खेळला गेला. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील इंडिया कॅपिटल्सने हा सामना ४ गडी राखून जिंकला आणि फायनलमध्ये प्रवेश केला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दरम्यान, या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भिलवाडा किंग्जचा युसूफ पठाण इंडिया कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन धक्काबुक्की करताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये सुरुवातीला युसूफ पठाण आणि मिचेल जॉन्सन यांच्यामध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. काही सेकंदांनंतर दोन्ही खेळाडू एकमेकांच्या जवळ येऊन धक्काबुक्की करताना दिसत आहेत. यानंतर जॉन्सन हसत निघून जातो. यादरम्यान संघातील इतर खेळाडू आणि पंचांनी मध्यस्थी करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

भिलवाडा किंग्जने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २२६ धावा केल्या होत्या. जे इंडिया कॅपिटल्सने ३ चेंडू बाकी असताना ६ गडी गमावून पूर्ण केले. नर्सने श्रीसंतच्या चेंडूवर षटकार मारून इंडिया कॅपिटल्सला फायनलमध्ये पोहोचवले. इंडिया कॅपिटल्सकडून रॉस टेलर (८४) आणि कॅरेबियन दिग्गज अॅश्ले नर्स (नाबाद ६०) यांनी शानदार खेळी केली.

पुढील बातम्या