मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी, महेंद्र गायकवाड उपविजेता

Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी, महेंद्र गायकवाड उपविजेता

Jan 14, 2023, 08:09 PM IST

  • Maharashtra kesari 2023 :  शिवराज राक्षेने आक्रमक खेळ करत महेंद्र गायकवाडला चितपट करून महाराष्ट्र केसरीच्या चांदीच्या गदेवर नाव कोरले आहे. त्याला पाच लाखांचे रोख बक्षीसही देण्यात आले.

शिवराज राक्षे यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी

Maharashtra kesari 2023 : शिवराज राक्षेने आक्रमक खेळ करत महेंद्र गायकवाडला चितपट करून महाराष्ट्र केसरीच्या चांदीच्या गदेवर नाव कोरले आहे. त्याला पाच लाखांचे रोख बक्षीसही देण्यात आले.

  • Maharashtra kesari 2023 :  शिवराज राक्षेने आक्रमक खेळ करत महेंद्र गायकवाडला चितपट करून महाराष्ट्र केसरीच्या चांदीच्या गदेवर नाव कोरले आहे. त्याला पाच लाखांचे रोख बक्षीसही देण्यात आले.

Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावला आहे. महाराष्ट्र केसरी २०२३ साठी अंतिम लढत पुण्याचा महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात पार पडली. यात राक्षेने गायकवाडला चितपट करत पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीवर नाव कोरले. शिवराज राक्षे ५५ वा महाराष्ट्र केसरी पैलवान ठरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

पुणे येथे झालेल्‍या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याने महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा आपल्‍या नावावर केली. त्‍याने महेंद्र गायकवाडचा पराभव केला.

मॅट विभागातील अंतिम लढत शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाली. या लढतीत शिवराज राक्षे याने विजय मिळवत अंतिम लढतीत धडक मारली. तर माती विभागातील अंतिम लढत सोलापूरचा सिकंदर आणि सोलापूरचाच महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. यातून महेंद्र गाडकवाड याने ६-४ अशा गुणांनी विजय मिळवत अंतिम लढतीत धडक मारली होती. 

अंतिम सामन्‍यात शिवराजने अवघ्या काही सेकंदात आक्रमक खेळी करत महेंद्रला चितपट महाराष्ट्र केसरीवर नाव कोरले. पाच लाख रूपये रोख बक्षीस आणि चांदीच्या गदा  त्याला प्रदान करण्यात आली. 

दोन्ही मल्ल हे पुण्याच्या तालमीतच तयार झाले आहेत. वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या कात्रज येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीत दोघांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे वस्ताद काका पवार यांच्या शिष्याने यंदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला मानाची गदा, महिद्रा थार ही गाडी व रोख पाच लाख रुपयांचे बक्षीस तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याला मानाची गदा, ट्रक्टर व रोख अडीच लाख रुपये देवून सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीत शिवराज व महेंद्र हे दोघेही तुल्ल्यबळ मल्ल यांनी एकमेकाना आजमावायला सुरुवात केली. मात्र यावेळी शिवराज राक्षेला पंचाकडून कुस्ती करण्याची ताकीद मिळाली. त्यानंतर ४० व्या सेकंदाला महेंद्रला देखील कुस्तीची ताकीद मिळाली. त्यावेळी बलदंड ताकदीच्या शिवराज राक्षेने दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न महेंद्रने हाणून पाडण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी शिवराजने महेंद्रवर ताबा घेण्याचा प्रयत्न करताना महेंद्रला दाबून टाकत चीतपट करताना महाराष्ट्र केसरीवर आपले नाव कोरले. शिवराजच्या विजयानंतर प्रेक्षकांनी एकाच जल्लोष केला.

तत्पूर्वी, माती विभागातून अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने वाशीमच्या सिकंदर शेखला ६-४ असे पराभूत करताना महाराष्ट्र केसरी किताबी लढतीत प्रवेश केला. लढतीच्या पहिल्या फेरीत दोन्ही मल्लांनी एकमेकाना आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी सिकंदरला निष्क्रिय कुस्तीची ताकीद देण्यात आली. मात्र सिकंदर यावेळी गुण मिळवू शकला नाही. त्यामुळे एक गुण महेंद्रला मिळाला. त्यानंतर १० सेकंदातच सिकंदरने ताबा घेताना २ गुणांची कमाई केली. पहिल्या फेरीत सिकंदरने २-१ अशी आघाडी मिळविली.

दुसऱ्या फेरीत सिकंदरने आक्रमक चाल रचताना महेंद्रला बाहेर ढकलताना एक गुण वसूल केला. यावेळी ३-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर महेंद्रला निष्क्रिय कुस्तीचा फटका बसला. यामुळे सिकंदराला एक गुण मिळाला. यावेळी सिकंदर ४-१ अशा आघाडीवर होता. आक्रमक कुस्ती होण्याच्या नादात महेंद्रने आपल्या ताकदीचा उपयोग बाहेरची टांग लावून सिकंदरला उचलून खाली फेकताना चार गुण कमावले. हाच या कुस्तीचा निर्णायक क्षण ठरला. शेवटी महेंद्रने सिकंदराला बाहेर ढकलताना अजून एका गुणाची कमाई करताना ही लढत ६-४ अशी जिंकताना महाराष्ट्र केसरीच्या किताबी लढतीसाठी पात्र ठरला.

गादी विभागाच्या लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरला ८-१ असे पराभूत करताना महाराष्ट्र केसरी या किताबी लढाईसाठी पात्र ठरला. आजच्या लढतीत शिवराजने चपळता व बलदंड शरीराचा वापर करताना चार वेळा हर्षवर्धनला बाहेर ढकलताना ४ गुणांची कमाई केली. दोनवेळा दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न करताना प्रत्येकी एकेक असे दोन गुण वसूल केले.

दुसऱ्या फेरीत पिछाडीवर असलेल्या हर्षवर्धनने आक्रमक खेळाला सुरुवात करताना शिवराजचा दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बलदंड शरीर व ताकदीच्या जोरावर शिवराजने हर्षवर्धनचा प्रयत्न उधळून लावत ताबा घेत २ गुणाची कमाई करताना गुणांची भक्कम आघाडी निर्माण केली. शेवटचे काही क्षण बाकी असताना आक्रमक झालेल्या हर्षवर्धनने आव्हान टिकविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मात्र यात हर्षवार्धानला केवळ एक गुण यश मिळाले. अशा प्रकारे ही लढत शिवराजने ८-१ अशा गुनाधीक्याने जिंकताना प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी मुख्य लढतीसाठी पात्र ठरला.

अंतिम लढत खेळणाऱ्या मल्लांचा स्पर्धेतील प्रवास -

माती विभाग -  महेंद्र गायकवाड : सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाडने पहिल्या फेरीत नांदेडच्या अनिल जाधवला ९-० असे पराभूत करताना आगेकूच केली. त्यानंतरच्या फेरीत हिंगोलीच्या दिगंबर भूतनरला चीतपट केले. तिसऱ्या फेरीत लातूरच्या शैलेश शेळकेला ५-२ असे पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेला चीतपट करताना महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत दावेदारी दाखल केली आहे.

गादी विभाग- शिवराज राक्षे : नांदेडच्या शिवराज राक्षेने गादी विभागात दमदार महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने पहिल्या फेरीत उस्मानाबादच्या धीरज बारस्करला १०-० असे एकतर्फी, दुसऱ्या फेरीत साताऱ्याच्या तुषार ठोंबरेला १०-० असे एकतर्फी तर तिसऱ्या फेरीत संभाजीनगरच्या (औरंगाबाद) पांडुरंग मोहारेला पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या फेरीत शिवराजने पुण्याच्या हर्षद कोकाटेला पराभूत करताना गादी विभागातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत हिंगोलीच्या गणेश जगतापवर १०-० अशी मात करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.

 

विभाग

पुढील बातम्या