मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Maharashtra Kesari: पैलवान मालामाल! १८ जावा बाईक, चांदीची गदा, थार आणि रोख... कोणाला काय मिळाल? पाहा

Maharashtra Kesari: पैलवान मालामाल! १८ जावा बाईक, चांदीची गदा, थार आणि रोख... कोणाला काय मिळाल? पाहा

Jan 15, 2023, 02:17 PM IST

    • Maharashtra Kesari 2023 prize money : महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावल्यानंतर शिवराज राक्षे याला मानाची चांदीची गदा, महिंद्रा थार जीप आणि ५ लाख रूपये रोख असे बक्षीस देण्यात आले. तर उपविजेता महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाख रूपयांचे बक्षीस देण्यात आले.
Maharashtra Kesari 2023 prize

Maharashtra Kesari 2023 prize money : महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावल्यानंतर शिवराज राक्षे याला मानाची चांदीची गदा, महिंद्रा थार जीप आणि ५ लाख रूपये रोख असे बक्षीस देण्यात आले. तर उपविजेता महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाख रूपयांचे बक्षीस देण्यात आले.

    • Maharashtra Kesari 2023 prize money : महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावल्यानंतर शिवराज राक्षे याला मानाची चांदीची गदा, महिंद्रा थार जीप आणि ५ लाख रूपये रोख असे बक्षीस देण्यात आले. तर उपविजेता महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाख रूपयांचे बक्षीस देण्यात आले.

शिवराज राक्षेने यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावला आहे. महाराष्ट्र केसरी २०२३ साठी अंतिम लढत पुण्याचा महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात पार पडली. यात राक्षेने गायकवाडला चितपट करत पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीवर नाव कोरले. शिवराज राक्षे ५५ वा महाराष्ट्र केसरी पैलवान ठरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड हे अंतिम सामन्यातील दोन्ही मल्ल पुण्यातच सराव करतात आणि विशेष म्हणजे दोघेही वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांचे शिष्य आहेत.

मॅट विभागातील अंतिम लढत शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाली. या लढतीत शिवराज राक्षे याने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. तर माती विभागातील अंतिम लढत सोलापूरचा सिकंदर शेख आणि सोलापूरचाच महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. यातून महेंद्र गाडकवाडने अंतिम लढतीत धडक मारली होती.

विजेता-उपविजेता मालामाल

महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावल्यानंतर शिवराज राक्षे याला मानाची चांदीची गदा, महिंद्रा थार जीप आणि ५ लाख रूपये रोख असे बक्षीस देण्यात आले. तर उपविजेता महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाख रूपयांचे बक्षीस देण्यात आले.

यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये राज्यातील ४५ तालीमीतील वेगवेगळ्या १८ वजनी गटात जवळपास ९०० हून अधिक पैलवानांनी सहभागी घेतला होता.

महाराष्ट्र केसरी जिंकणाऱ्या पैलवानाला मानाची चांदीची गदा, महिंद्रा थार जीप आणि ५ लाख रूपये असे बक्षीस देण्यात येते. याशिवाय महाराष्ट्र सरकारकडून या पैलवानांना ५ हजार रूपयांचे मानधनदेखील दिले जाते. यावर्षी या मानधनात वाढ झाली आहे. यंदापासून हे मानधन १५ हजार रूपये करण्यात आले आहे. शिवाय महाराष्ट्र केसरी खेळाडूंना राज्य सरकार नोकरीत संधी देणार आहे. यासोबतच सर्व १८ वजनी गटातील १८ विजेत्यांना जावा बाईक देण्यात येणार आहे.

विभाग

पुढील बातम्या