मराठी बातम्या  /  क्रीडा  /  LPL 2023 : लाईव्ह सामन्यात सापाची एन्ट्री, दिनेश कार्तिकनं उडवली बांगलादेशच्या नागीण डान्सची खिल्ली

LPL 2023 : लाईव्ह सामन्यात सापाची एन्ट्री, दिनेश कार्तिकनं उडवली बांगलादेशच्या नागीण डान्सची खिल्ली

Jul 31, 2023, 08:00 PM IST

    • LPL 2023 snake on cricket ground: लीग लंका प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात मैदानात साप आल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात सापाने दर्शन दिले. त्यावेळी बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाबिक-अल-हसन गोलंदाजी करत होता.
LPL 2023

LPL 2023 snake on cricket ground: लीग लंका प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात मैदानात साप आल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात सापाने दर्शन दिले. त्यावेळी बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाबिक-अल-हसन गोलंदाजी करत होता.

    • LPL 2023 snake on cricket ground: लीग लंका प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात मैदानात साप आल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात सापाने दर्शन दिले. त्यावेळी बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाबिक-अल-हसन गोलंदाजी करत होता.

श्रीलंकेत लीग लंका प्रीमियर लीगची (LPL 2023) सुरुवात झाली आहे. लीगचा दुसरा सामना आज (३१ जुलै) गाले टायटन्स आणि दाम्बुला ऑरा (GT vs DA) यांच्यात झाला. सामन्यादरम्यान मैदानावर सापाने एन्ट्री घेतली. साप आल्याने सामना काही काळ थांबवावा लागला. आता त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

लीग लंका प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात मैदानात साप आल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात सापाने दर्शन दिले. त्यावेळी बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाबिक-अल-हसन गोलंदाजी करत होता, त्याने पहिल्यांदा साप पाहिला. यानंतर त्याने हाताने साप आल्याचा इशारा केला. व्हिडिओमध्ये अंपायर सापाला मैदानातून बाहेर काढताना दिसत आहे.

सीमारेषेजवळ आढळला साप

दाम्बुला संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना ही घटना घडली आहे. कुसल परेरा आणि धनंजय डिसिल्वा क्रीजवर होते. दुसऱ्या डावातील चौथ्या षटकाचा खेळ संपला, त्याचवेळी सीमारेषेजवळ अचानक साप दिसला. भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने या घटनेवर बांगलादेशी क्रिकेटपटूंची मजा घेतली.

कार्तिकने उडवली बांगलादेशच्या नागिन डान्सची खिल्ली

वास्तविक, २०१८ मध्ये निदहास ट्रॉफीमध्ये बांगलादेशने सेमीफायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. विजयानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी नागीन डान्स केला. त्यांचा हा नागीन डान्स त्यावेळी खूप गाजला होता. त्या घटनेची आठवण करून दिनेश कार्तिकने मजेशीर ट्विट करत बांगलादेश संघाची खिल्ली उडवली.

दुसरीकडे, या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास गाले टायटन्सने सुपर ओव्हरमध्ये दाम्बुला ऑराला पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना गाले टायटन्स संघाने २० षटकांत ५ गडी गमावून १८० धावा केल्या. अशाप्रकारे दाम्बुला ऑरासमोर विजयासाठी १८१ धावांचे लक्ष्य होते. पण दाम्बुला ऑरालादेखील २० षटकांत ७ गडी बाद १८० धावाच करता आल्या. अशा प्रकारे सामना बरोबरीत संपला, परंतु गाले टायटन्सने सुपर ओव्हरमध्ये दाम्बुला ऑराचा पराभव केला.

पुढील बातम्या