मराठी बातम्या  /  क्रीडा  /  वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियशिपमध्ये भारतीय मुलींचा दबदबा, देशाला चार सुवर्णपदक मिळण्याची शक्यता!

वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियशिपमध्ये भारतीय मुलींचा दबदबा, देशाला चार सुवर्णपदक मिळण्याची शक्यता!

Mar 24, 2023, 08:11 AM IST

  • world boxing championships 2023: वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियशिपमध्ये भारतीय मुलींनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर फायनलमध्ये धडक दिली आहे.

Nikhat Zareen

world boxing championships 2023: वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियशिपमध्ये भारतीय मुलींनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर फायनलमध्ये धडक दिली आहे.

  • world boxing championships 2023: वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियशिपमध्ये भारतीय मुलींनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर फायनलमध्ये धडक दिली आहे.

World Boxing Championships Final: देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. या स्पर्धेत लोव्हलिना बोरगोहेन (Lovlina Borgohain) निकहत जरीन (Nikhat Zareen), नितू घंघास (Nitu ghanghas) आणि स्वीटी बुरा (saweety boora) यांनी आपपल्या वजन गटात दमदार प्रदर्शनाच्या जोरावर फायनमध्ये धडक दिली आहे. या स्पर्धेत भारताचे चार पदके निश्चित झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या मुलींची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. या स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यात स्वीटी बूरा (८१ किलोग्रॅम), लोव्हलिना बोरगोहेन (७५ किलोग्रॅम), निकहत जरीन (५० किलोग्रॅम) आणि नीतू घंघास हिने ५० किलोग्रॅम वजनी गटात विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय मुलींच्या घवघवीत यशानंतर या स्पर्धेतील भारताचे चार पदके निश्चित झाली असून त्यावर कोणता रंग चढणार? हे फायनल सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

लोव्हलिनाने मोझांबिकच्या अॅडोसिंडा राडी ग्रामानेवर 5-0 ने विजय मिळवत फायनल गाठली. आता देशाला तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. भारतासाठी साक्षी चौधरी (५२ किलोग्रॅम वजनी गट) आणि गेल्या आवृत्तीतील कांस्यपदक विजेती मनीषा मौन (५७ किलोग्रॅम वजनी गट) अंतिम चारमध्ये पोहोचू शकल्या नाहीत. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या जास्मिन लॅम्बोरिया (६० किलोग्रॅम वजनी गट) आणि नुपूर शेओरान (+८१ किलोग्रॅम वजनी गट) यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.

विभाग

पुढील बातम्या