मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Football : फुटबॉल सामन्यादरम्यान मैदानावर वीज कोसळली, एका खेळाडूचा मृत्यू; ६ जण रुग्णालयात

Football : फुटबॉल सामन्यादरम्यान मैदानावर वीज कोसळली, एका खेळाडूचा मृत्यू; ६ जण रुग्णालयात

Dec 13, 2023, 04:58 PM IST

    • Lightning In Football Match : फुटबॉल सामन्यादरम्यान मैदानावर वीज पडल्याने एका खेळाडूच मृत्यू झाला आहे. तर ६ खेळाडू जखमी झाले आहेत.
Lightning In Football Match brazil

Lightning In Football Match : फुटबॉल सामन्यादरम्यान मैदानावर वीज पडल्याने एका खेळाडूच मृत्यू झाला आहे. तर ६ खेळाडू जखमी झाले आहेत.

    • Lightning In Football Match : फुटबॉल सामन्यादरम्यान मैदानावर वीज पडल्याने एका खेळाडूच मृत्यू झाला आहे. तर ६ खेळाडू जखमी झाले आहेत.

Lightning Strike In Football Match : फुटबॉलच्या मैदानातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फुटबॉल सामन्यादरम्यान मैदानावर वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे. ही घटना ब्राझीलच्या 'सँटो अँटोनियो दा प्लॅटिना' शहरात घडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

येथील एका फुटबॉल सामन्यादरम्यान वीज पडली. मैदानाच्या मध्यभागी पडलेल्या या विजेमुळे एका २१ वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू झाला. तर इतर ६ खेळाडूही या नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडले. या ६ खेळाडूंवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, ही घटना तीन दिवस जुनी आहे. १० डिसेंबर रोजी जोस एल्युटेरियो दा सिल्वा स्टेडियमवर यूनिआओ जेरेन्स फुटबॉल क्लब विरुद्ध यूनिडोस फुटबॉल क्लब यांच्यात सामना खेळला जात होता. 

विजेचा कडकडाट होताच खेळाडू मैदानात कोसळले

सामन्यादरम्यान अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला. यादरम्यान फुटबॉल मैदानावर मोठा आवाज झाला आणि मैदानाबाहेर पडत असलेले खेळाडू अचानक खाली कोसळले. 

यात  'यूनिआओ जेरेन्स फुटबॉल क्लबचा खेळाडू कायो हेन्रिक डी लिमा गोन्काल्व्हसचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एका खेळाडूची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हा खेळाडू शहराबाहेरील प्रादेशिक रुग्णालयात दाखल आहे. इतर ४ खेळाडू शहरातील स्थानिक रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सॅंटो अँटोनियो दा प्लॅटिना सिटी हॉलने गोन्काल्व्हस याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि सांगितले आहे की या अपघातामुळे प्रभावित झालेल्यांची सर्व शक्य ती काळजी घेतली जाईल.

घाबरवणारा व्हिडीओ समोर आला

या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओचे व्हिज्युअल्स खूपच भीतीदायक आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की स्टेडियममध्ये जोरदार पाऊस पडत आहे आणि तेथे उपस्थित काही प्रेक्षक जोरजोरात ओरडत आहेत. अनेक जण मैदानावर पडलेल्या खेळाडूंना उचलतानाही दिसत आहेत.

 

पुढील बातम्या