मराठी बातम्या  /  क्रीडा  /  किस्सा फुटबॉलचा! झिदाननं सांगितलं गाडीत बस तर आदरानं पायातले शूज काढायला लागला एम्बाप्पे

किस्सा फुटबॉलचा! झिदाननं सांगितलं गाडीत बस तर आदरानं पायातले शूज काढायला लागला एम्बाप्पे

Jan 17, 2023, 01:54 PM IST

    • Kylian Mbappe & Zinedine Zidane 1st meeting : किलियन एम्बाप्पे हे नाव आज सर्वांना माहीत आहे. २३ वर्षीय एमबाप्पेनं जगभरातील फुटबॉल चाहत्यांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं आहे. याच एम्बाप्पेचा एक किस्सा सांगणार आहोत. एम्बाप्पे आणि झिनेदीन झिदान यांच्या भेटीचा हा किस्सा आहे.
Kylian Mbappe & Zinedine Zidane

Kylian Mbappe & Zinedine Zidane 1st meeting : किलियन एम्बाप्पे हे नाव आज सर्वांना माहीत आहे. २३ वर्षीय एमबाप्पेनं जगभरातील फुटबॉल चाहत्यांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं आहे. याच एम्बाप्पेचा एक किस्सा सांगणार आहोत. एम्बाप्पे आणि झिनेदीन झिदान यांच्या भेटीचा हा किस्सा आहे.

    • Kylian Mbappe & Zinedine Zidane 1st meeting : किलियन एम्बाप्पे हे नाव आज सर्वांना माहीत आहे. २३ वर्षीय एमबाप्पेनं जगभरातील फुटबॉल चाहत्यांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं आहे. याच एम्बाप्पेचा एक किस्सा सांगणार आहोत. एम्बाप्पे आणि झिनेदीन झिदान यांच्या भेटीचा हा किस्सा आहे.

Kylian Mbappe : फ्रान्सच्या बोंडी शहरात जन्मलेला एक फुटबॉलपटू, ज्याचं नाव आता प्रत्येक क्रीडाप्रेमीला माहीत आहे. अवघ्या २३ वर्षांच्या एम्बाप्पेनं लिओनेल मेस्सीचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न जवळपास संपुष्टात आणलं होतं. फिफा वर्ल्डकप २०२२ फायनलमध्ये अर्जेंटिना एकतर्फी जिंकणार असं वाटत असतानाच एमबाप्पेनं अवघ्या २ मिनिटांत खेळ फिरवला आणि सामन्यात जीव आणला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

त्या सामन्यात एमबाप्पे जे काही करू शकत होता, ते सर्व त्यानं केलं. वर्ल्ड कप फायनलमध्ये हॅटट्रिकपासून ते गोल्डन बूटपर्यंत सर्व काही एमबाप्पेने साध्य केलं आहे. मात्र, सर्व प्रयत्न करूनही फ्रान्सला सलग दुसरा वर्ल्डकप जिंकून देण्यात तो अपयशी ठरला. या दरम्यान या सुपरस्टार फुटबॉलरशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत.

जेव्हा एमबाप्पे पहिल्यांदा झिदानला भेटला

Kylian Mbappe जेव्हा १४ वर्षांचा होता तेव्हा त्याला फुटबॉल क्लब रियल माद्रिदच्या १५ वर्षांखालील संघासोबत ट्रेनिंग घेण्याची संधी मिळाली. याच काळात त्याची महान फुटबॉलर झिनेदिन झिदानशी भेट झाली. विशेष म्हणजे, झिदान स्वतः एमबाप्पेला भेटायला आला होता. या घटनेचा संदर्भ देत एमबाप्पेने एका मीडिया चॅनेलला सांगितलं होतं.

तो म्हणाला की, 'मी कार पार्किंगमध्ये झिदानला भेटलो. त्याच्याकडे एक अलीशान कार होती. त्यानं मला त्याच्या कारमधून ट्रेनिंग ग्राउंडवर नेण्याची ऑफर दिली. त्यानं मला समोरच्या सीटवर येऊन बसण्यास सांगितलं. हे ऐकून मी उडालोच. मी त्याला विचारलं की मी माझे बूट काढू का? मी हे का बोललो ते मला माहीत नाही. त्यानंतर झिदाननं मला तसं करण्यास मनाई केली आणि त्यानं मला त्याच्या कारमध्ये बसवलं.

या घटनेची आठवण करून देताना एमबाप्पेनं पुढे सांगितलं की, मी झिदानसोबत कारमध्ये बसलो आहे यावर विश्वास बसत नव्हता. हे खरंच घडतंय की, मी झोपेत स्वप्न पाहतोय? हे मला कळत नव्हतं."

वयाच्या २३ व्या वर्षी एमबाप्पेने विश्वचषकासह अनेक ट्रॉफी जिंकल्या आहेत. या वयातच एमबाप्पेनं जगभरातील फुटबॉल चाहत्यांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलंय. ज्या वेगानं तो आपलं करिअर पुढे नेतोय, अशा स्थितीत तो येत्या काही काळात फुटबॉल जगतातील सर्वात मोठा सुपरस्टार बनू शकतो.

पुढील बातम्या