मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Kylian Mbappe : किलियन एम्बाप्पेवर पैशांचा पाऊस, सौदीच्या ‘या’ क्लबने दिली २७२५ कोटींची ऑफर

Kylian Mbappe : किलियन एम्बाप्पेवर पैशांचा पाऊस, सौदीच्या ‘या’ क्लबने दिली २७२५ कोटींची ऑफर

Jul 24, 2023, 06:15 PM IST

    • Kylian Mbappe al hilal : सौदी अरेबियाचा फुटबॉल क्लब अल-हिलालने PSG मधून Kylian Mbappe ला साइन करण्यासाठी ३३२ मिलियन्स डॉलर्सची बोली लावली आहे.
Kylian Mbappe al hilal (REUTERS)

Kylian Mbappe al hilal : सौदी अरेबियाचा फुटबॉल क्लब अल-हिलालने PSG मधून Kylian Mbappe ला साइन करण्यासाठी ३३२ मिलियन्स डॉलर्सची बोली लावली आहे.

    • Kylian Mbappe al hilal : सौदी अरेबियाचा फुटबॉल क्लब अल-हिलालने PSG मधून Kylian Mbappe ला साइन करण्यासाठी ३३२ मिलियन्स डॉलर्सची बोली लावली आहे.

फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पे आणि त्याचा क्लब पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) यांच्यातील संबंध अतिशय बिघडले आहेत. आगामी हंगामापूर्वी पीएसजी संघ जपानच्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, या दौऱ्यासाठी एम्बाप्पेची संघात निवड करण्यात आलेली नाही. इतकेच नाही तर पीएसजी क्लबने त्याला विकण्याचा निर्णय घेतला आहे. तो आता ट्रान्सफर मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

अशातच एम्बाप्पेबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. सौदी अरेबियाचा फुटबॉल क्लब अल-हिलालने PSG मधून Kylian Mbappe ला साइन करण्यासाठी ३३२ मिलियन्स डॉलर्सची म्हणजेच २७५७ कोटी रुपयांची बोली लावली आहे. 

पीएसजीनंतर एमबाप्पे रिअल माद्रिदमध्ये जावू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. पण आता एम्बाप्पेला साईन करण्याच्या शर्यतीत अल हिलाल क्लबदेखील सामील झाला आहे.

वाद कसा सुरू झाला?

एमबाप्पेने २०२२  मध्ये PSG सोबत नवीन करार केला होता. त्यावेळी त्याने २०२५ पर्यंत संघासोबत राहण्याचे आश्वासन दिले होते. तर Mbappe आणि PSG यांच्यातील करारानुसार एम्बाप्पे २०२४ पर्यंत क्लबचा खेळाडू राहील. तसेच, जून २०२४ नंतर तो त्याचा करार एक वर्षासाठी वाढवू शकतो. पण आता एम्बाप्पेने क्लबला एक वर्ष अगोदरच पत्र लिहून जून २०२४ नंतर करार वाढवणार नसल्याचे सांगितले आहे. इथून संपूर्ण वादाला सुरुवात झाली.

एम्बाप्पेला घेण्यासाठी अनेक क्लब शर्यतीत

वादाच्या बातम्या बाहेर आल्यानंतर अनेक क्लब एमबाप्पेला विकत घेऊ इच्छितात. यामध्ये रियल माद्रिद आघाडीवर आहे. एम्बाप्पेला अनेक वर्षांपासून या स्पॅनिश क्लबकडून खेळण्याची इच्छा होती. त्याला लहानपणापासूनच रिअल माद्रिदला जायचे होते, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने ते आजतागायत शक्य झाले नाही. रिअल माद्रितशिवाय मँचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल, चेल्सी हे संघही एम्बाप्पेला साईन करण्याच्या स्पर्धेत आहेत.

पुढील बातम्या