मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mbappe Video: एम्बाप्पेनं खेळाडूंना असं चार्ज केलं... अख्खं जग बघत राहिलं, फायनलचं ते स्पीच व्हायरल

Mbappe Video: एम्बाप्पेनं खेळाडूंना असं चार्ज केलं... अख्खं जग बघत राहिलं, फायनलचं ते स्पीच व्हायरल

Dec 25, 2022, 05:19 PM IST

    • Kylian Mbappe speech Fifa World Cup Final Video: अर्जेंटिनाने वर्ल्डकप जिंकला असेल, पण विश्वचषकात हॅट्ट्रिकसह एकूण ४ गोल करणाऱ्या फ्रेंच स्टार किलियन एमबाप्पेचीही जगभरात प्रचंड चर्चा होत आहे.
Mbappe Video

Kylian Mbappe speech Fifa World Cup Final Video: अर्जेंटिनाने वर्ल्डकप जिंकला असेल, पण विश्वचषकात हॅट्ट्रिकसह एकूण ४ गोल करणाऱ्या फ्रेंच स्टार किलियन एमबाप्पेचीही जगभरात प्रचंड चर्चा होत आहे.

    • Kylian Mbappe speech Fifa World Cup Final Video: अर्जेंटिनाने वर्ल्डकप जिंकला असेल, पण विश्वचषकात हॅट्ट्रिकसह एकूण ४ गोल करणाऱ्या फ्रेंच स्टार किलियन एमबाप्पेचीही जगभरात प्रचंड चर्चा होत आहे.

अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक २०२२ चे विजेतेपद पटकावले. फायनलमध्ये लिओनेल मेस्सीच्या संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला. मेस्सीने विश्वचषक जिंकला आणि अर्जेंटिना तब्बल ३६ वर्षांनंतर चॅम्पियन ठरला. पण या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती २४ वर्षीय किलियन एमबाप्पेची. २०१८ च्या वर्ल्डकपमध्ये वयाच्या १९व्या वर्षी आपल्या देशाला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या एम्बाप्पेने या फायनलमध्येही पुन्हा एकदा दमदार खेळ दाखवला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात किलियन एमबाप्पेने ऐतिहासिक हॅटट्रिक केली. सामन्याच्या ८० व्या मिनिटाला अर्जेंटिना २-० ने आघाडीवर होता. त्यावेळी अर्जेंटिना एकतर्फी सामना जिंकेल असे वाटत असतानाच एम्बाप्पेने चमत्कार केला. त्याने अशी चपळता दाखवली की संपूर्ण जग थक्क झाले.

ब्रेकमध्ये एम्बाप्पेनं भरला खेळाडूंमध्ये जोश

हाफ टाइमपर्यंत अर्जेंटिनाने २ गोल केले होते. त्यानंतर किलियन एमबाप्पेने चेंजिंग रूममध्ये आपल्या सहकाऱ्यांमध्ये जोश भरला. अंगावर काटा आणणाऱ्या एम्बाप्पेच्या स्पीचचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एमबाप्पे म्हणत आहे की, 'ही वर्ल्ड कप फायनल आहे, हा आयुष्यभराचा सामना आहे. आपण याहून वाईट खेळू शकत नाही. आता मैदानात गेल्यावर आपण एकतर त्यांना सहज जिंकू देऊ किंवा आपण आपली स्पीड वाढवू. ही विश्वचषक फायनल आहे. त्यांनी २ गोल केले आहेत, आपण दोन गोल मागे आहोत. पण आपण परत येऊ शकतो. अशी संधी ४ वर्षातून एकदाच येते".

एम्बाप्पेनं सामन्यात जीव आणला

अर्जेंटिनाने पहिल्या हाफमध्ये आक्रमक खेळ दाखवला, त्यामुळे फ्रान्स पूर्णपणे बॅकफूटवर गेला होता. दुसऱ्या हाफमध्येही ७९व्या मिनिटापर्यंत अर्जेंटिना २-० अशा आघाडीवर होता. पण तेवढ्यात फ्रान्सला पेनल्टी किक मिळाली आणि २३ वर्षीय किलियन एमबाप्पे अॅक्शनमध्ये आला. फ्रान्सने पहिला गोल केला.

या गोलचा फ्रान्सचे चाहते जल्लोष करतच होते, तेवढ्या एम्बाप्पेने आणखी एक गोल करत सामना २-२ असा बरोबरीत पोहोचवला. ८१व्या मिनिटाला एम्बाप्पेने आपला दमदार खेळ दाखवत मार्कस थुरामच्या साथीने दुसरा गोल केला. अवघ्या ९७ सेकंदांच्या अंतराने एम्बाप्पेने हा चमत्कार करून दाखवला होता. एम्बाप्पेमुळे एकतर्फी सुरू असलेल्या सामन्यात जीव आला.

एम्बाप्पेला गोल्डन बुट

एम्बाप्पे एवढ्यावरच थांबला नाही. सामना एक्स्ट्रा टाईममध्ये गेला. तेव्हा एम्बाप्पेने एक्स्ट्रा टाईममध्येदेखील गोल केला. एक्स्ट्रा टाईममध्येही सामना ३-३ मध्ये बरोबरीत राहिला. त्यामुळे फायनलचा निकाल पेनल्टी शुटआऊटमध्ये लागला. पेनल्टी शुटआऊटमध्येही एम्बाप्पेने गोल केला. अशा प्रकारे अंतिम सामन्यात त्याने ४ गोल केले.

त्यानंतर एम्बाप्पेने या सामन्यात हॅट्ट्रिक केली. त्याने या वर्ल्डकपमध्ये एकूण ८ गोल केले. त्याला गोल्डन बुटचा पुरस्कार मिळाला. १९६६ नंतर पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हॅट्ट्रिक केली आहे.

 

पुढील बातम्या