मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Kane Williamson Net Worth : केन विल्यमसनची नेटवर्थ किती? कशी करतो कोट्यवधींची कमाई? जाणून घ्या

Kane Williamson Net Worth : केन विल्यमसनची नेटवर्थ किती? कशी करतो कोट्यवधींची कमाई? जाणून घ्या

Aug 08, 2023, 11:18 AM IST

    • kane williamson birthday : न्यूझीलंडचा टी-२० आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार केन विल्यमसन आज ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान फलंदाजांमध्ये केन विल्यमसनची गणना केली जाते. विल्यमसन त्याच्या फलंदाजीची शैली आणि नेतृत्व गुणांसाठी देखील ओळखला जातो.
kane williamson birthday

kane williamson birthday : न्यूझीलंडचा टी-२० आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार केन विल्यमसन आज ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान फलंदाजांमध्ये केन विल्यमसनची गणना केली जाते. विल्यमसन त्याच्या फलंदाजीची शैली आणि नेतृत्व गुणांसाठी देखील ओळखला जातो.

    • kane williamson birthday : न्यूझीलंडचा टी-२० आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार केन विल्यमसन आज ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान फलंदाजांमध्ये केन विल्यमसनची गणना केली जाते. विल्यमसन त्याच्या फलंदाजीची शैली आणि नेतृत्व गुणांसाठी देखील ओळखला जातो.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आज (८ऑगस्ट)  त्याचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान फलंदाजांमध्ये विल्यमसनची गणना केली जाते. विल्यमसन त्याच्या फलंदाजीची शैली आणि नेतृत्व गुणांसाठी देखील ओळखला जातो.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

विराट कोहली, जो रूट आणि स्टीव्ह स्मिथसह केन विल्यमसनचादेखील फॅब-4 मध्ये समावेश आहे. आजच्या युगात केन विल्यमसन हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. अशा परिस्थितीत, त्याच्या वाढदिवसाच्या खास निमित्त आपण केन विल्यमसनच्या एकूण नेटवर्थबद्दल जाणून घेणार आहोत.

खरं तर, केन विल्यमसनने १० ऑगस्ट २०१० रोजी भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, पहिल्याच सामन्या तो शून्यावर बाद झाला. आपल्या दुसऱ्या सामन्यातही केन विल्यमसन शुन्यावर बाद झाला. पण संघाला त्याच्या प्रतिभेबद्दल शंका नव्हती, त्यामुळे त्याला संधी मिळत राहिली. यानंतर त्याने बांगलादेशविरुद्ध वनडेतील पहिले शतक झळकावले. त्यानंतर २०१० मध्येच त्याला अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली.

केन विल्यमसनची नेटवर्थ किती?

हा उत्कृष्ट फॉर्म केन विल्यमसनने कायम ठेवला आणि ब्रेंडन मॅक्युलमच्या निवृत्तीनंतर त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये न्यूझीलंड संघाचा कर्णधार बनवण्यात आले.

केन विल्यमसनच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्याची एकूण नेटवर्थ ८० कोटी रुपये आहे. त्याला न्यूझीलंड क्रिकेटकडून वर्षाला ४ कोटी रुपये मिळतात. याशिवाय तो अनेक ब्रँड्सना एंडोर्स करतो आणि आयपीएलमधील करारांमधूनही बक्कळ कमाई करतो.

केन विल्यमसनची क्रिकेट कारकीर्द

केन विल्यमसनने आतापर्यंत ९४ कसोटी सामने खेळताना ८१२४ धावा केल्या आहेत ज्यात २८ शतके, ६ द्विशतके आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या २५१ आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये केन विल्यमसनने १६१ सामन्यांमध्ये ६५५५ धावा केल्या आहेत ज्यात १३ शतके आणि ४२ अर्धशतकांचा समावेश आहे. T20 मध्ये ८७ सामने खेळताना २४६४ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये केन विल्यमसनने ७७ सामन्यांमध्ये २१०१ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने १८ अर्धशतके झळकावली.

पुढील बातम्या