मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Jos Buttler: 'भारत-पाक फायनल' प्रश्नावर बटलरची सटकली, संतापून म्हणाला...

Jos Buttler: 'भारत-पाक फायनल' प्रश्नावर बटलरची सटकली, संतापून म्हणाला...

Nov 09, 2022, 02:53 PM IST

    • jos buttler on india vs pak final: भारत-इंग्लंड सेमी फायनलचा सामना १० नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
jos buttler on india vs pak final

jos buttler on india vs pak final: भारत-इंग्लंड सेमी फायनलचा सामना १० नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली.

    • jos buttler on india vs pak final: भारत-इंग्लंड सेमी फायनलचा सामना १० नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना १० नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. या प्रसंगी त्याने असेही सांगितले की, भारताला हरवण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

भारत-पाकिस्तान फायनल बघायची इच्छा नाही

दरम्यान, यावेळी बटलरला भारत-पाकिस्तान फायनल होईल का? असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने थोडी संतप्त प्रतिक्रिया दिली. बटलर म्हणाला की, 'नक्कीच मला भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना बघायची इच्छा नाही. भारत-पाकिस्तानच्या चाहत्यांची पार्टी खराब करण्याचा आमचा प्रयत्न असेल".

डेव्हिड मलान आणि मार्क वुड यांच्या दुखापतीबद्दल बटलर काय म्हणाला

कर्णधार जोस बटलरने डेव्हिड मलान आणि मार्क वुड यांच्या दुखापतींबाबतही माहिती दिली. "ते दोघेही सेमी फायनलपूर्वी तंदुरुस्त होतील, असे बटलरने म्हटले आहे. दोघेही भारताविरुद्धचा सामना खेळू शकतील की नाही, हे आताच ठरवता येणार नाही, असेही बटलरने सांगितले

युझवेंद्र चहलबद्दल बटलर काय म्हणाला

फिरकीपटू चहलबाबत बटलर म्हणाला की, तो एक महान गोलंदाज आहे आणि तो नेहमीच विकेटच्या शोधात असतो. जर त्याला सेमी फायनल खेळण्याची संधी मिळाली तर ते भारताच्या दृष्टीने चांगलेचांगले असेल.

पुढील बातम्या