मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ENG vs NZ 2nd Test : आज ब्रॅडमन यांचा मोठा रेकॉर्ड मोडला असता... जो रूट थोडक्यात चुकला!

ENG vs NZ 2nd Test : आज ब्रॅडमन यांचा मोठा रेकॉर्ड मोडला असता... जो रूट थोडक्यात चुकला!

Feb 28, 2023, 12:57 PM IST

    • joe root ENG vs NZ 2nd Test :सामन्याच्या पहिल्या डावात जो रूटने शतक झळकावले होते. त्याने पहिल्या डावात १५३ धावा ठोकल्या होत्या. या शतकासह त्याने महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली होती.
joe root - sir don bradman

joe root ENG vs NZ 2nd Test :सामन्याच्या पहिल्या डावात जो रूटने शतक झळकावले होते. त्याने पहिल्या डावात १५३ धावा ठोकल्या होत्या. या शतकासह त्याने महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

    • joe root ENG vs NZ 2nd Test :सामन्याच्या पहिल्या डावात जो रूटने शतक झळकावले होते. त्याने पहिल्या डावात १५३ धावा ठोकल्या होत्या. या शतकासह त्याने महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

joe root missed don bradman record : वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा अवघ्या एका धावेने पराभव केला आहे. न्यूझीलंडने आपल्या कसोटी इतिहासातील सर्वात कमी फरकाने कसोटी सामना जिंकला आहे. या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. सामना कोणता संघ जिंकणार हे शेवटपर्यंत स्पष्ट होत नव्हते. पण शेवटी न्यूझीलंडने एका धावेने थरारक विजय मिळवला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दरम्यान, सामन्याच्या पहिल्या डावात जो रूटने शतक झळकावले होते. त्याने पहिल्या डावात १५३ धावा ठोकल्या होत्या. या शतकासह त्याने महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

जो रूटच्या कारकिर्दीतील हे २९ वे शतक होते. डॉन ब्रॅडमन यांनीही आपल्या कारकिर्दीत २९ शतके झळकावली आहेत. वेलिंग्टन कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याच्याकडे ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड तोडण्याची संधी. त्याने त्याकडे वाटचालदेखील जबरदस्त केली होती. पण जो रूट ९५ धावांवर बाद झाला. त्यामुळे अवघ्या ५ धावांनी तो त्याच्या ३०व्या शतकापासून आणि ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड तोडण्यापासून थोडक्यात वंचित राहिला.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने रूटची शिकार केली. रूटने ११३ चेंडूत ९५ धावा केल्या.

डिसेंबर २०१२ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या जो रूटने १० वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत १०, ८९६ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी ४९.७७ आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने ५६ अर्धशतकेही केली आहेत.

रूट सचिनचा हा विक्रम मोडू शकतो

जो रूटने १२९ कसोटी सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो १२व्या क्रमांकावर आहे. तो नंबर-१ वर असलेल्या सचिन तेंडुलकरच्या १५,९२१ धावांपेक्षा ५ हजार धावांनी मागे आहे. रूट फक्त ३२ वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत जर तो ५-७ वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये राहिला आणि अशाच पद्धतीने धावा करत राहिला तर तो सचिनचा विक्रम मोडू शकतो.

 

पुढील बातम्या