मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Indian Bowling Attack : भारत ११ वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकणार, फक्त संघात 'असं' गोलंदाजी आक्रमण पाहिजे

Indian Bowling Attack : भारत ११ वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकणार, फक्त संघात 'असं' गोलंदाजी आक्रमण पाहिजे

Aug 04, 2023, 05:06 PM IST

    • Indian Bowling Attack for odi world cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच मैदानात पुनरागमन करू शकतो. आयर्लंड मालिकेसाठी तो संघात परतण्याची अपेक्षा आहे. अशा स्थितीत बुमराह तंदुरुस्त झाल्यानंतर टीम इंडियाची गोलंदाजी आणखी धोकादायक बनेल.
odi world cup 2023

Indian Bowling Attack for odi world cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच मैदानात पुनरागमन करू शकतो. आयर्लंड मालिकेसाठी तो संघात परतण्याची अपेक्षा आहे. अशा स्थितीत बुमराह तंदुरुस्त झाल्यानंतर टीम इंडियाची गोलंदाजी आणखी धोकादायक बनेल.

    • Indian Bowling Attack for odi world cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच मैदानात पुनरागमन करू शकतो. आयर्लंड मालिकेसाठी तो संघात परतण्याची अपेक्षा आहे. अशा स्थितीत बुमराह तंदुरुस्त झाल्यानंतर टीम इंडियाची गोलंदाजी आणखी धोकादायक बनेल.

टीम इंडियाचा अनुभवी आणि घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या वर्षी सप्टेंबरपासून खेळापासून दूर होता. यामुळे त्याला अनेक मोठ्या स्पर्धांना मुकावे लागले. पण शस्त्रक्रियेनंतर बुमराह आता चांगला दिसत असून गोलंदाजीही करत आहे. तो लवकरच मैदानावर दिसणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

बुमराह तंदुरुस्त झाल्यानंतर तो वनडे विश्वचषक खेळण्याची खात्री आहे. त्याच्या आगमनाने संघाचे वेगवान आक्रमण आणखीनच घातक होणार आहे. ही गोलंदाजी क्रमवारी फॉर्ममध्ये राहिल्यास टीम इंडिया सहज विश्वचषक जिंकू शकेल.

मोहम्मद शमी

mohammed shami

टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आगामी विश्वचषकात भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सध्या तो संघातील सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या उपस्थितीमुळे वेगवान आक्रमणाला बळ मिळेलच, पण मोठ्या सामन्यांमध्ये शमीचा अनुभवही कामी येईल. शमीने भारताकडून ९० वनडे सामन्यांमध्ये १६२ विकेट घेतल्या आहेत.

मोहम्मद सिराज

siraj

युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजमुळे बुमराह आणि शमीला खूप मदत होणार आहे. सिराज हा विकेट घेणारा गोलंदाज आहे. खेळाच्या कोणत्याही टप्प्यावर संघासाठी विकेट घेण्याची ताकद त्याच्यात आहे. तो भारतीय खेळपट्ट्यांवर आपल्या गोलंदाजीने विश्वचषकात धुमाकूळ घालू शकतो. सिराजने भारताकडून २४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४३ विकेट घेतल्या आहेत.

उमरान मलिक

umran

जम्मू काश्मीर एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचे नावही या यादीत सामील आहे. उमरानला विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाल्यास तो आपल्या अतिरिक्त वेगाने दहशत निर्माण करू शकतो आणि फलंदाजांचे जगणे कठीण करू शकतो. त्याचा अतिरिक्त वेग फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. उमरानने भारताकडून आतापर्यंत ८ वनडे सामन्यांमध्ये १३ विकेट घेतल्या आहेत.

जसप्रीत बुमराह

bumrah

जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन हा भारतीय क्रिकेट संघासाठी सर्वात मोठा एक्स फॅक्टर असेल. बुमराहच्या किफायतशीर गोलंदाजीचा संघाला चांगलाच उपयोग होणार आहे. डेथ ओव्हरमध्ये जसप्रीतचा यॉर्कर भल्याभल्यांना पाणी मागायला लावतो. बुमराहमध्ये सुरुवातीला त्याच्या स्विंग आणि सीम गोलंदाजीने विकेट घेण्याची ताकद आहे. बुमराहने टीम इंडियासाठी आतापर्यंत ७२ वनडेत १२१ विकेट घेतल्या आहेत. जर बुमराह, शमी, सिराज आणि उमरान असे वेगवान आक्रमण संघात असेल तर विरोधी फलंदाजांचे कंबरडं मोडणं जवळपास निश्चित आहे.

पुढील बातम्या