मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ishan Kishan Test Fifty : इशानचा ऋषभच्या स्टाईलमध्ये एका हाताने षटकार, बॅटवर पंतचं नाव लिहून ठोकलं अर्धशतक

Ishan Kishan Test Fifty : इशानचा ऋषभच्या स्टाईलमध्ये एका हाताने षटकार, बॅटवर पंतचं नाव लिहून ठोकलं अर्धशतक

Jul 24, 2023, 11:55 AM IST

    • Ishan Kishan Debut Test Fifty : दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्माने इशान किशनला फलंदाजीत बढती देत ​​सातव्या क्रमांकावरून थेट चौथ्या क्रमांकावर पाठवले. कारकिर्दीतील तिसऱ्या कसोटी डावात इशानने अर्धशतक ठोकले. इशान किशनने ३४ चेंडूत ५२ धावा केल्या. इशानच्या बॅटमधून ४ चौकार आणि २ षटकार निघाले.
Ishan Kishan Debut Test Fifty

Ishan Kishan Debut Test Fifty : दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्माने इशान किशनला फलंदाजीत बढती देत ​​सातव्या क्रमांकावरून थेट चौथ्या क्रमांकावर पाठवले. कारकिर्दीतील तिसऱ्या कसोटी डावात इशानने अर्धशतक ठोकले. इशान किशनने ३४ चेंडूत ५२ धावा केल्या. इशानच्या बॅटमधून ४ चौकार आणि २ षटकार निघाले.

    • Ishan Kishan Debut Test Fifty : दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्माने इशान किशनला फलंदाजीत बढती देत ​​सातव्या क्रमांकावरून थेट चौथ्या क्रमांकावर पाठवले. कारकिर्दीतील तिसऱ्या कसोटी डावात इशानने अर्धशतक ठोकले. इशान किशनने ३४ चेंडूत ५२ धावा केल्या. इशानच्या बॅटमधून ४ चौकार आणि २ षटकार निघाले.

ind vs wi 2nd test day 4 : इशान किशन आणि ऋषभ पंत हे भारतीय क्रिकेटचे दोन उगवते तारे आहेत जे त्यांच्या अंडर-19 दिवसांपासून चमकत आहेत. २०१६ अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत दोघांनी मिळून भारताला अंतिम फेरीत नेले होते. आता दोघेही वरिष्ठ भारतीय क्रिकेट संघाचा भाग आहेत. फरक एवढाच आहे की ऋषभ पंतने २०१८ मध्येच कसोटी पदार्पण केले होते, तर इशान किशनला ५ वर्षांनंतर म्हणजेच २०२३ मध्ये ही संधी मिळाली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इशानला कसोटी कॅप मिळाली. त्या अंडर-19 विश्वचषकात इशान किशन कर्णधार होता, तर ऋषभ पंत यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळत होता. काळ बदलला, वर्षे बदलली, यष्टिरक्षक असल्याने परिस्थितीने दोघांनाही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनवले, पण जुनी मैत्री आणि ते नाते आजही कायम आहे.

ऋषभ पंतच्या स्टाईलमध्ये षटकार

रस्ता अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर ऋषभ पंत सध्या टीम इंडियातून बाहेर आहे, ज्याचा फायदा इशान किशनला झाला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या इशान किशनला मात्र या संधीचे सोने करता आले नाही. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही तो स्वस्तात बाद झाला, मात्र दुसऱ्या डावात या युवा डावखुऱ्या यष्टीरक्षक फलंदाजाने झंझावाती खेळी करताना अवघ्या ३३ चेंडूत पहिले अर्धशतक ठोकले.

इशानने लागोपाठ दोन चेंडूत दोन षटकार मारत हा आपले अर्धशतक पूर्ण केले. विशेष म्हणजे त्याने हे अर्धशतक ऋषभ पंतच्या बॅटने ठोकले. सोबतच इशानने एका हाताने मारलेले दोन्ही षटकारही ऋषभ पंतची आठवण करून देत होते.

ऋषभ पंतला धन्यवाद

इशान किशनने पहिले कसोटी अर्धशतक झळकावल्यानंतर ऋषभ पंतचे आभार मानले आहेत. तो म्हणाला की, 'येथे येण्यापूर्वी मी एनसीएमध्ये सराव करत होतो आणि ऋषभही तिथे रिहॅब करत होता. त्याने मला बॅट पोझिशन आणि इतर गोष्टींबद्दल काही छान सल्ले दिले. आमच्या अंडर-19 दिवसांपासून आम्ही अनेक सामने एकत्र खेळलो आहोत. त्याला माझी मानसिकता माहीत आहे. मलाही असेच कोणीतरी पुढे यावे आणि माझ्या फलंदाजीबद्दल काहीतरी सांगावे अशी माझी इच्छा होती, म्हणून धन्यवाद ऋषभ.

फलंदाजीत इशान किशनला बढती

दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्माने इशान किशनला फलंदाजीत बढती देत ​​सातव्या क्रमांकावरून थेट चौथ्या क्रमांकावर पाठवले. कारकिर्दीतील तिसऱ्या कसोटी डावात इशानने अर्धशतक ठोकले. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने कसोटी क्रिकेटमधील भारतासाठी सर्वात जलद अर्धशतकीय भागीदारी नोंदवली. त्यांनी अवघ्या ५.३ षटकात भारताची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली. त्यामुळे भारताने दुसरा डाव १८१/२ वर घोषित केला आणि विंडीजसमोर ३६५ धावांचे लक्ष्य ठेवले.

पुढील बातम्या