मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ishan kishan : आकाश चोप्रा म्हणाला, आप धोनी हो... इशाननं केला पोपट, इतर कॉमेंटेटर खळखळून हसले

Ishan kishan : आकाश चोप्रा म्हणाला, आप धोनी हो... इशाननं केला पोपट, इतर कॉमेंटेटर खळखळून हसले

Aug 03, 2023, 03:36 PM IST

    • Aakash Chopra Ishan kishan : भारत वेस्ट इंडिज तिसऱ्या सामन्यातील एक प्रसंग व्हायरल होत आहे. यामध्ये आकाश चोप्राने कॉमेंट्रीदरम्यान इशान किशनला तुझे नाव धोनी नाही, असे म्हटले. यावर इशान किशनने जबरदस्त उत्तर दिले आहे.
Ishan Kishan and Aakash Chopra

Aakash Chopra Ishan kishan : भारत वेस्ट इंडिज तिसऱ्या सामन्यातील एक प्रसंग व्हायरल होत आहे. यामध्ये आकाश चोप्राने कॉमेंट्रीदरम्यान इशान किशनला तुझे नाव धोनी नाही, असे म्हटले. यावर इशान किशनने जबरदस्त उत्तर दिले आहे.

    • Aakash Chopra Ishan kishan : भारत वेस्ट इंडिज तिसऱ्या सामन्यातील एक प्रसंग व्हायरल होत आहे. यामध्ये आकाश चोप्राने कॉमेंट्रीदरम्यान इशान किशनला तुझे नाव धोनी नाही, असे म्हटले. यावर इशान किशनने जबरदस्त उत्तर दिले आहे.

Ishan Kishan and Aakash Chopra viral stump mic conversation : यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनसाठी वेस्ट इंडिज दौरा चांगलाच यशस्वी ठरला. तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके झळकावली. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावून इशानने एमएस धोनी, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन सारख्या खेळाडूंच्या क्लबमध्ये समावेश केला आहे, या खेळाडूंनी एकाच मालिकेत सलग अलग तीन अर्धशतके ठोकली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

आकाश चोप्राची कॉमेंट्री, इशानचं उत्तर

या वनडे मालिकेतील तीनही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावणारा किशन इशान किशन हा नवोदित विकेकीपर आहे. या सामन्यात आकाश चोप्रा कॉमेंट्री करत होता. यावेळी एका प्रसंगी इशानने स्टंपिंगसाठी अपील केले, पण कॉमेंट्रीमध्ये आकाश चोप्रा ऑन-एअर म्हणाला की, ' इशान किशन तु रांचीचा असशील, पण तुझे नाव एमएस धोनी नाही.

एवढ्यात स्टंप माईकमधून इशानचा आवाज आला, 'तो म्हणाला की हो ठीक आहे मग'. इशानच्या आवाजानंतर स्टुडिओमधील इतर कॉमेंटेटर पोट धरून हसायला लागतात. मग यानंतर आकाश चोप्रा सारवासारव करत म्हणतो, "इशान किती गोंडस आहे. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो.” या घटनेचा व्हिडिओ स्वतः आकाश चोप्राने शेअर केला आहे.

इशान किशन ठरला प्लेअर ऑफ द सिरीज

दरम्यान, इशान किशनने वनडे मालिकेचा प्लेअर ऑद सिरीज आहे. पण या कामगिरीवर तो जास्त खूश नाही. सामन्यानंतर तो म्हणला, की "मी दिलेल्या फिनिशिंगवर मी फारसा खूश नाही. सेट झाल्यानंतर मला मोठी धावसंख्या करायची होती. माझ्या वरिष्ठांनी मला तेच सांगितले होते, मी क्रीजवर राहून ते करायला हवे होते." पुढच्या वेळी मी मैदानात सेट होऊन मोठा स्कोर करेन. "

 

पुढील बातम्या