मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ashes 2023 : इंग्लंड-ऑस्ट्रेलियन खेळाडूंमधील वाद पुन्हा पेटला! स्मिथ-बेयरस्टो भिडले, व्हिडीओ पाहा

Ashes 2023 : इंग्लंड-ऑस्ट्रेलियन खेळाडूंमधील वाद पुन्हा पेटला! स्मिथ-बेयरस्टो भिडले, व्हिडीओ पाहा

Jul 08, 2023, 12:28 PM IST

    • steve smith jonny bairstow fight Ashes 2023 : अॅशेस मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमधील वाद सुरुच आहेत. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथ आणि जॉनी बेयरस्टो यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
steve smith jonny bairstow fight

steve smith jonny bairstow fight Ashes 2023 : अॅशेस मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमधील वाद सुरुच आहेत. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथ आणि जॉनी बेयरस्टो यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

    • steve smith jonny bairstow fight Ashes 2023 : अॅशेस मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमधील वाद सुरुच आहेत. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथ आणि जॉनी बेयरस्टो यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

eng vs aus 3rd test Headingley Ashes 2023 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात चांगलाच वाद झाला. स्मिथ बाद झाल्यानंतर जॉनी बेअरस्टो काहीतरी बडबडला, जे स्टंप माइकमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे. यानंतर स्टीव्ह स्मिथने थांबून बेअरस्टोला विचारले, काय म्हणालास मित्रा? यावर बेअरस्टोने उत्तर देत म्हटले, 'चीयर्स नंतर भेटू.'

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दरम्यान, हे प्रकरण आणखी पुढे जाण्याआधीच दोन्ही खेळाडूंनी समजूतदारपणाची भूमिका घेतली. पण स्मिथ आणि बेअरस्टो यांच्यातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्टीव्ह स्मिथ आपला १०० वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. मात्र, या खास सामन्यात स्मिथला फलंदाजीत आपली चमक दाखवता आली नाही. स्मिथने पहिल्या डावात २२ तर दुसऱ्या डावात केवळ २ धावा केल्या. मात्र, क्षेत्ररक्षणात त्याने ५ झेल घेऊन एक मोठा विक्रम नक्कीच केला.

दुसऱ्या कसोटीत काय घडलं होतं

विशेष म्हणजे, या अॅशेस मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील खेळाडूंमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यापासून संघर्ष सुरू आहे. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जॉनी बेअरस्टोला ज्याप्रकारे धावबाद केले त्यामुळे इंग्लंड संघ खूपच निराश झाला आणि त्यांनी कांगारू संघाने खिलाडूवृत्तीचा विचार न केल्याचा आरोपही केला. मात्र, ऑस्ट्रेलियाने बेअरस्टोला बाद करून कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे सांगितले.

लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा संघ चौथ्या डावात ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. यादरम्यान स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो ही इंग्लंडकडून फलंदाजीची शेवटची जोडी होती. डावाच्या ५२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कॅमेरून ग्रीनने बेअरस्टोला धारदार बाउन्सर टारला. बेअरस्टोने हा चेंडू विकेटच्या मागे अॅलेक्स कॅरीकडे जाऊ दिला. या दरम्यान, चेंडूही पूर्ण झाला नव्हता तोच बेअरस्टो क्रीझ सोडून स्टोक्सच्या दिशेने गेला.

अशा स्थितीत अॅलेक्स कॅरीने चेंडू विकेटवर फेकून बेअरस्टोला धावबाद केले. हे पाहून संपूर्ण इंग्लंड कॅम्प आश्चर्यचकित झाला कारण बेअरस्टोने जाणूनबुजून क्रीज सोडली नाही. अशा परिस्थितीत हे प्रकरण चांगलेच तापले. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनीही या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले होते.

पुढील बातम्या