मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sourav Ganguly : इरफानने पकडली दादाची मोठी चूक, वाढदिवसाच्या दिवशीच सौरव गांगुली ट्रोल

Sourav Ganguly : इरफानने पकडली दादाची मोठी चूक, वाढदिवसाच्या दिवशीच सौरव गांगुली ट्रोल

Jul 08, 2023, 01:45 PM IST

    • sourav ganguly irfan pathan : सौरव गांगुलीने त्याच्या ५१व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला एक ट्विट केले आहे. यानंतर इरफान पठाणने त्याला प्रत्युत्तर देताना एक चूक लक्षात आणून दिली आणि त्याला ट्रोल केले.
Ganguly and irfan pathan

sourav ganguly irfan pathan : सौरव गांगुलीने त्याच्या ५१व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला एक ट्विट केले आहे. यानंतर इरफान पठाणने त्याला प्रत्युत्तर देताना एक चूक लक्षात आणून दिली आणि त्याला ट्रोल केले.

    • sourav ganguly irfan pathan : सौरव गांगुलीने त्याच्या ५१व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला एक ट्विट केले आहे. यानंतर इरफान पठाणने त्याला प्रत्युत्तर देताना एक चूक लक्षात आणून दिली आणि त्याला ट्रोल केले.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आज ५१ वर्षांचा झाला. क्रिकेट जगतात दादा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गांगुलीने या खास दिवसाच्या पूर्वसंध्येला एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यात त्याच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील फोटोंची मालिका समाविष्ट आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

गांगुलीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करत असतानाच्या आठवणी आहेत. मात्र, या व्हिडीओतील एक चूक इरफान पठाणने पकडली आहे. डिसेंबर २००३ मध्ये गांगुलीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पठाणने गांगुलीच्या निदर्शनास आणून दिले की व्हिडिओमधील एक फोटो हा आपल्या फलंदाजीचा आहे, तो तुमच्या (गांगुलीचा) नाही.

गांगुलीने चुकून व्हिडीओमध्ये इरफानचा फोटो जोडला

पठाणने गांगुलीला गंमतीने ट्रोल करत लिहिले की, “दादी, मला माहित नव्हते की आपण दोघे फलंदाजी करताना इतके सारखे दिसतो की तुम्ही गोंधळून जाल, परंतु धन्यवाद, मी हे एक मोठा सन्मान म्हणून घेईन”. आपल्या ट्विटमध्ये पठाणने गंमतीने गांगुलीला 'दादी' असे संबोधले, जे त्याचे सहकारी त्याला म्हणतात.

सौरव गांगुलीचे करिअर

गांगुलीने १९९२ मध्ये बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड सीरिजमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने १९९६ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक झळकावले. गांगुली हा जगातील महान फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने ११३ कसोटीत १६ शतकांसह ७२१२ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, गांगुलीने ३११ सामने खेळले आणि २२ शतकांसह ११ हजार ३६३ धावा केल्या. सचिन तेंडुलकरसोबत त्याने सलामीला येत ८२२७ धावा जोडल्या.

पुढील बातम्या