मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sourav Ganguly Birthday : फलंदाजीत हे फक्त गांगुलीनेच केलं! सचिन-विराटलाही जमले नाहीत असे पराक्रम, जाणून घ्या

Sourav Ganguly Birthday : फलंदाजीत हे फक्त गांगुलीनेच केलं! सचिन-विराटलाही जमले नाहीत असे पराक्रम, जाणून घ्या

Jul 08, 2023, 11:40 AM IST

    • Sourav Ganguly Birthday : दादा नावाने फेमस असलेल्या या फलंदाजाच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक विक्रम आहेत, जे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारखे फलंदाजही करू शकले नाहीत.
Sourav Ganguly Birthday

Sourav Ganguly Birthday : दादा नावाने फेमस असलेल्या या फलंदाजाच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक विक्रम आहेत, जे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारखे फलंदाजही करू शकले नाहीत.

    • Sourav Ganguly Birthday : दादा नावाने फेमस असलेल्या या फलंदाजाच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक विक्रम आहेत, जे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारखे फलंदाजही करू शकले नाहीत.

Sourav Ganguly records : भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज कर्णधार झाले आहेत. यामध्ये सौरव गांगुलीचे स्थान सर्वात वरचे आहे. २००० साली भारतीय संघ फिक्सिंगच्या भोवऱ्यात अडकला होता, त्यावेळी गांगुलीने कर्णधार बनून संघाला या काळोखातून बाहेर काढले. सौरव गांगुली आज (८ जुलै) त्याचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी सौरव गांगुलीचे चाहते सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांता वर्षाव करताना दिसत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दादा नावाने फेमस असलेल्या या फलंदाजाच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक विक्रम आहेत, जे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारखे फलंदाजही करू शकले नाहीत. आज बर्थडे बॉयच्या अशाच काही रेकॉर्डवर नजर टाकणार आहोत.

सलग ४ सामन्यात मॅन ऑफ द मॅच

गांगुलीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग ४ सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे. विेशेष म्हणजे गांगुलीने हा पराक्रम एकाच मालिकेत केला होता. अद्याप कोणताही क्रिकेटर त्याचा हा विक्रम मोडू शकले नाहीत.

वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वोत्तम धावसंख्या

गांगुली हा एकदिवसीय विश्वचषकात सर्वात मोठी खेळी खेळणारा भारतीय फलंदाज आहे. १९९९ मध्ये टॉन्टन येथे त्याने श्रीलंकेविरुद्ध १५५ चेंडूत १८३ धावांची खेळी केली होती.

चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक शतके

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज सौरव गांगुली आहे. या आयसीसीच्या या स्पर्धेत त्याने ३ शतके झळकावली आहेत. सोबतच सौरव गांगुली हा एकमेव क्रिकेटर आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये १६ शतके झळकावली आहेत आणि संघाने एकही सामना गमावलेला नाही. याशिवाय त्याची आयसीसी नॉकआउट्स सामन्यांमधील फलंदाजी सरासरी ८५.६६ आहे, जी जगातील सर्वोच्च आहे.

 

पुढील बातम्या