मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sourav Ganguly Birthday : गांगुलीनं टीम इंडियाला दादागिरी शिकवली, इंग्लंड-ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात लोळवलं

Sourav Ganguly Birthday : गांगुलीनं टीम इंडियाला दादागिरी शिकवली, इंग्लंड-ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात लोळवलं

Jul 08, 2023, 11:13 AM IST

    • Sourav Ganguly Birthday : भारतीय क्रिकेटच्या महान कर्णधारांमध्ये सौरव गांगुलीचे नाव नेहमीच घेतले जाते. गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आक्रमकतेने खेळायला सुरुवात केली.
Sourav Ganguly Birthday

Sourav Ganguly Birthday : भारतीय क्रिकेटच्या महान कर्णधारांमध्ये सौरव गांगुलीचे नाव नेहमीच घेतले जाते. गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आक्रमकतेने खेळायला सुरुवात केली.

    • Sourav Ganguly Birthday : भारतीय क्रिकेटच्या महान कर्णधारांमध्ये सौरव गांगुलीचे नाव नेहमीच घेतले जाते. गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आक्रमकतेने खेळायला सुरुवात केली.

Sourav Ganguly 51st Birthday : भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज कर्णधार झाले आहेत. यामध्ये सौरव गांगुलीचे स्थान सर्वात वरचे आहे. २००० साली भारतीय संघ फिक्सिंगच्या भोवऱ्यात अडकला होता, त्यावेळी गांगुलीने कर्णधार बनून संघाला या काळोखातून बाहेर काढले. सौरव गांगुली आज (८ जुलै) त्याचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी सौरव गांगुलीचे चाहते सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांता वर्षाव करताना दिसत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सौरव गांगुलीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात १९९२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे पदार्पणाने झाली. यानंतर गांगुलीला पुढच्या संधीसाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. १९९६ साली इंग्लंड दौऱ्यावर गांगुलीला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच कसोटीत त्याने शतक झळकावले. गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले. सोबतच ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघालाही भारताने त्यांच्या घरच्या मैदानावर धुळ चारण्यास सुरुवात केली.

गांगुलीने टीम इंडियाला दादागिरी शिकवली

२००० मध्ये सौरव गांगुलीला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले, तेव्हा टीम बदलाच्या टप्प्यातून जात होती. त्यात वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ आणि झहीर खान या महत्त्वाच्या खेळाडूंसह अनेक नवीन युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला. गांगुलीने आपल्या कर्णधारपदात सर्वांना संधी तर दिलीच, शिवाय त्यांना स्टार खेळाडूही बनवले.

२००२ मध्ये गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्यांदा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याच वर्षी टीम इंडियाने लॉर्ड्सच्या मैदानावर सौरव गांगुलीची दादागिरीही पाहिली, जेव्हा भारताने नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला त्याच्या घरच्या मैदानावर एका रोमहर्षक सामन्यात पराभूत केले. इथून चाहत्यांना टीम इंडियाची बेधडक स्टाइल पाहायला मिळाली.

गांगुलीच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा विजय रथ रोखला

९० च्या दशकातील ऑस्ट्रेलियन संघाचा सामना करणे आणि पराभूत करणे हे कोणत्याही संघासाठी सोपे काम नव्हते, परंतु भारतीय संघाने ते करून दाखवले. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम ऑस्ट्रेलियात ४ सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेली होती, तेव्हा भारताने तेथे एक सामना जिंकण्यात यश मिळवले. पण ही त्याकाळी खूप मोठी कामगिरी होती. कारण गांगुलीच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा सलग १६ कसोटी सामन्यांचा विजय रथ रोखला होता.

पुढील बातम्या