मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Eng vs Aus 3rd Test : हेडिंग्लेत दिसला बॅझबॉलचा दम, इंग्लंडनं तिसरी कसोटी वनडे स्टाईलमध्ये जिंकली

Eng vs Aus 3rd Test : हेडिंग्लेत दिसला बॅझबॉलचा दम, इंग्लंडनं तिसरी कसोटी वनडे स्टाईलमध्ये जिंकली

Jul 09, 2023, 08:19 PM IST

    • aus vs eng 3rd test : इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी २५१ धावांचे लक्ष्य होते. बेन स्टोक्सच्या संघाने ५० षटकात ७ विकेट गमावत २५४ धावा करत मालिकेतील पहिला विजय नोंदवला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक धावा केल्या.
aus vs eng 3rd test

aus vs eng 3rd test : इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी २५१ धावांचे लक्ष्य होते. बेन स्टोक्सच्या संघाने ५० षटकात ७ विकेट गमावत २५४ धावा करत मालिकेतील पहिला विजय नोंदवला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक धावा केल्या.

    • aus vs eng 3rd test : इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी २५१ धावांचे लक्ष्य होते. बेन स्टोक्सच्या संघाने ५० षटकात ७ विकेट गमावत २५४ धावा करत मालिकेतील पहिला विजय नोंदवला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक धावा केल्या.

Headingley Test, AUS vs ENG Match Report : अॅशेस मालिकेतील तिसर्‍या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ३ गडी राखून पराभव केला आहे. इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी २५१ धावांचे लक्ष्य होते. बेन स्टोक्सच्या संघाने ५० षटकात ७ विकेटच्या मोबदल्यात २५४ धावा करत सामना जिंकला. हॅरी ब्रूक इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने ९३ चेंडूत ७५ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार मारले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया पहिला डाव- २६३ सर्वबाद 

(मिचेल मार्श ११८) (मार्क वूड ५/४३)

इंग्लंड पहिला डाव- २३७ सर्वबाद

(बेन स्टोक्स- ८०) (पॅट कमिन्स ९१/६)

ऑस्ट्रेलिया दुसरा डाव- २२४ सर्वबाद

(ट्रेव्हिस हेड-७७) (स्टुअर्ट ब्रॉड- ४५/३)

इंग्लंड दुसरा डाव- ७ बाद २५४

(हॅरी ब्रुक- ७५)  (मिचेल स्टार्क- ७८/५)

मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला होता. त्यामुळे मालिकेत जिवंत राहण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकणे गरजेचे होते. इंग्लंडने हा सामना जिंकून ५ कसोटी सामन्यांच्या अॅशेस मालिकेत पुनरागमन केले आहे. मालिका आता २-१ अशा स्थितीत पोहोचली आहे. 

हॅरी ब्रूकची शानदार खेळी

तत्पूर्वी, २५१ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. जॅक क्रॉलीने ५५ चेंडूत ४४ धावांची खेळी केली, तर बेन डकेटने ४१ चेंडूत २३ धावा केल्या. मात्र, याशिवाय मोईन अली, जो रूट, बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांनी निराशा केली.

पण यानंतर हॅरी ब्रूकने ख्रिस वोक्ससोबत ७५ धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. ख्रिस वोक्सने नाबाद ३२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

या सामन्यात काय घडले?

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर मिचेल स्टार्कने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श यांना १-१ यश मिळाले. लीड्स कसोटीत प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेला कांगारू संघ २६३ धावांवर गारद झाला. याला प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २३७ धावांवर सर्वबाद झाला. 

अशाप्रकारे पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला २६ धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २२४ धावा केल्या. अशाप्रकारे इंग्लंडसमोर विजयासाठी २५१ धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने ७ विकेट्स गमावून लक्ष्य गाठले आणि मालिकेतील पहिला विजय नोंदवला.

पुढील बातम्या