मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : संजू, इशान, श्रेयस नाही… तर ‘हे’ ५ खेळाडू भविष्यातील सुपरस्टार, गांगुलीची भविष्यवाणी

IPL 2023 : संजू, इशान, श्रेयस नाही… तर ‘हे’ ५ खेळाडू भविष्यातील सुपरस्टार, गांगुलीची भविष्यवाणी

Feb 25, 2023, 07:33 PM IST

    • Sourav Ganguly IPL 2023 : बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याच्या मते, पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांच्या व्यतिरिक्त उमरान मलिक हा देखील आयपीएलच्या पुढील ५ ते ६ हंगामात एक मोठा स्टार म्हणून उदयास येऊ शकतो.
Sourav Ganguly

Sourav Ganguly IPL 2023 : बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याच्या मते, पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांच्या व्यतिरिक्त उमरान मलिक हा देखील आयपीएलच्या पुढील ५ ते ६ हंगामात एक मोठा स्टार म्हणून उदयास येऊ शकतो.

    • Sourav Ganguly IPL 2023 : बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याच्या मते, पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांच्या व्यतिरिक्त उमरान मलिक हा देखील आयपीएलच्या पुढील ५ ते ६ हंगामात एक मोठा स्टार म्हणून उदयास येऊ शकतो.

Indian Premier league 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने अशा ५ भारतीय खेळाडूंची नावे सांगितली आहेत जे इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या येत्या ५ ते ६ हंगामात मोठे स्टार म्हणून उदयास येऊ शकतात. बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली याने संजू सॅमसन, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांची नावे आपल्या यादीत समाविष्ट केलेली नाहीत.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

संजू सॅमसन, इशान किशन आणि श्रेयस अय्यर हे गेल्या अनेक सीझनपासून आयपीएलमध्ये खेळत आहेत आणि ते आपापल्या टीमचा एक महत्त्वाचा भाग देखील आहेत. संजू सॅमसन सध्या राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार आहे, तर श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आहे. तर इशान किशन हा मुंबई इंडियन्सचा महत्वाच्या फलंदाजांपैकी एक आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या एका शोमध्ये बोलताना सौरव गांगुली म्हणाला की, या लीगमध्ये मला दिसणारा पुढचा मोठा सुपरस्टार खेळाडू सूर्यकुमार यादव आहे. तो आता तरुण खेळाडूंमध्ये गणला जाऊ शकत नाही, मात्र, तो पुढील काही काळात खूप मोठा खेळाडू बनेल. दुसरीकडे, युवा खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉ माझ्यासाठी नंबर वन असेल, ज्याच्याकडे टी-20 फॉरमॅटमध्ये खेळण्याची खूप प्रतिभा आहे. यानंतर माझ्यासाठी ऋषभ पंत दुसऱ्या क्रमांकावर आहे ज्याने स्वतःला आधीच सिद्ध केले आहे.

गांगुलीने त्याच्या यादीत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याच्या नावाचाही समावेश केला आहे. त्याचवेळी, यानंतर, गांगुलीने वेगवान गोलंदाज उमरान मलिकचाही आपल्या यादीत समावेश केला आहे. गांगुलीच्या मते, जर तो फिट राहिला तर आगामी काळात तो खूप धोकादायक गोलंदाज म्हणून दिसेल.

भज्जीने शुबमन गिलची आठवण करून दिली

या शोमध्ये हरभजन सिंग हादेखील सहभागी होता. भज्जीने गांगुलीला शुभमन गिलबद्दल विचारले तेव्हा दादाने सांगितले की मी त्याचे नाव विसरत आहे पण मला माझ्या यादीत ५वा खेळाडू म्हणून शुभमन गिलचा समावेश करायला आवडेल.

पुढील बातम्या