मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2022: रायुडूची झुंझार खेळी व्यर्थ..शिखर-ऋषी धवनची कमाल, पंजाबची चेन्नईवर मात

IPL 2022: रायुडूची झुंझार खेळी व्यर्थ..शिखर-ऋषी धवनची कमाल, पंजाबची चेन्नईवर मात

Apr 26, 2022, 12:11 AM IST

    • पंजाब किंग्सने रोमांचक लढतीत चेन्नई सुपर किंग्सवर ११ धावांनी मात केली. अंतिम षटकात २७ धावांची गरज असताना क्रीझवर असणारे धोनी व जडेजा ही जोडी कमाल करून शकली नाही व चेन्नईला यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा पंजाबकडून पराभव पत्करावा लावला.
पंजाबचीचेन्नईवर मात

पंजाब किंग्सनेरोमांचक लढतीतचेन्नई सुपर किंग्सवर ११ धावांनी मात केली. अंतिम षटकात २७ धावांची गरज असताना क्रीझवर असणारे धोनी व जडेजा ही जोडी कमाल करून शकली नाही व चेन्नईला यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा पंजाबकडून पराभव पत्करावा लावला.

    • पंजाब किंग्सने रोमांचक लढतीत चेन्नई सुपर किंग्सवर ११ धावांनी मात केली. अंतिम षटकात २७ धावांची गरज असताना क्रीझवर असणारे धोनी व जडेजा ही जोडी कमाल करून शकली नाही व चेन्नईला यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा पंजाबकडून पराभव पत्करावा लावला.

मुंबई – मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२२ मधील ३८ व्या सामन्यात पंजाब किंग्सने रोमांचक लढतीत चेन्नई सुपर किंग्सवर ११ धावांनी मात केली. आपला २०० वा सामना खेळणारा शिखर धवन आणि २०१६ नंतर पहिल्यांदात आयपीएल खेळणारा ऋषि धवन पंजाबच्या विजयाचे हिरो ठरले. शिखर धावनने केलेल्या नाबाद ८८ धावांच्या बळावर पंजाबने चेन्नईसमोर १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र या आव्हानापासून चेन्नई ११ धावा दूर राहिली. चेन्नईकडून अंबाती रायुडूने ३९ चेंडूत तडाखेबाज ७८ धावांची खेळी केली मात्र तो संघाला विजयी करू शकला नाही. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सीएसके २० षटकात ६ बाद १७६ धावांपर्यंतच मजल मारू शकला.  पंजाबकडून  ऋषि धवन आणि कसिगो रबाडा यांनी २-२ विकेट घेतल्या. या विजयाबरोबरच  पंजाबचे ८ अंक झाले आहेत. पंजाब अंकतालिकेत ६ व्या स्थानी पोहोचला आहे. 

शेवटच्या षटकात चेन्नईला २७ धावांची गरज होती. धोनीने पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकून विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र तिसऱ्या चेंडूवर धोनी बाद झाला व चेन्नईच्या विजयाच्या आशा हवेत विरल्या. धोनीने ८ चेंडूत १ चौकार व १ षटकाराच्या मदतीने १२ धावा केल्या.

चेन्नईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रॉबिन उथप्पा केवळ एका धावेवर तंबूत परतला. त्यानंतर मिशेन सँटेनर व शिवम दुबे प्रत्येक ९ व ८ धावांवर माघारी परतले. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ३० धावांचे योगदान दिले. कर्णधार रविंद्र जडेजाने १६ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या. 

 

पंजाबचा डाव -

आजच्या सामन्यात पंजाबकडून अनुभवी फलंदाज शिखर धवनने ५९ चेंडूत ९ चौकार व २ षटकारांच्या मदतीने नाबाद ८८ धावांची धडाकेबाज खेळी केली. तसेच भानुका राजपक्षा याने केलेल्या ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने  निर्धारित २० षटकात ४ बाद १८७ धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईला विजयासाठी १८८ धावांचे मजबूत आव्हान होते. 

या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार रवींद्र जाडेजाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून अगदी अचूक टप्प्यावर  गोलंदाजी करत पंजाबच्या फलंदाजांना रोखून धरले. कर्णधार मयांक अग्रवालही स्वस्तात माघारी परतला. पण सलामीवीर शिखरने एकहाती झुंज देत ८८ धावा केल्याने पंजाबने पावणे दोनशेचा टप्पा ओलांडला. 

पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल ३७ धावांवर बाद झाला. त्यानंतर सलामीवीर शिखर धवनने भानुका राजपक्षासोबत एक मोठी भागिदारी रचली. भानुका ३२ चेंडूत २ चौकार व २ षटकार ठोकून ४२ धावांवर बाद झाला. शिखरने शेवटपर्यत किल्ला लढवत नाबाद ८८ धावा केल्या. 

विभाग

पुढील बातम्या