मराठी बातम्या  /  क्रीडा  /  एका नो बॉलची पडद्यामागची कहाणी ; रिकी पॉन्टिंगने काय केलं वाचा सविस्तर

एका नो बॉलची पडद्यामागची कहाणी ; रिकी पॉन्टिंगने काय केलं वाचा सविस्तर

Apr 27, 2022, 07:16 PM IST

    • दिल्ली राजस्थान संघादरम्यान झालेल्या सामन्यात दिल्लीचा कोच रिकी पॉन्टिंगने हॉटेलमध्ये नासधूस केल्याचं समोर येत आहे.
दिल्लीचे कोच रिकी पॉन्टिंग (हिंदुस्तान टाइम्स)

दिल्ली राजस्थान संघादरम्यान झालेल्या सामन्यात दिल्लीचा कोच रिकी पॉन्टिंगने हॉटेलमध्ये नासधूस केल्याचं समोर येत आहे.

    • दिल्ली राजस्थान संघादरम्यान झालेल्या सामन्यात दिल्लीचा कोच रिकी पॉन्टिंगने हॉटेलमध्ये नासधूस केल्याचं समोर येत आहे.

रिकी पॉन्टिंग. मैदानातला एक अतिशय आक्रमक कर्णधार. आजवर त्याचा आक्रमकपणा मैदानात सर्वच खेळाडूंनी अनुभवलेला. ऑस्ट्रेलियाचा कप्तान असताना तर रिकी पॉन्टिंग भर मैदानात भल्या भल्या खेळाडूंबरोबर बाचाबाची करायचा हे आपण सर्वांनी पाहिलं होत. पॉन्टिंग इतका स्लेजिंग करणारा क्वचितच एखादा दुसरा खेळाडू असेल.  सध्या रिकी पॉन्टिंग दिल्ली संघाचा कोच म्हणून काम पाहातोय. 

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

ती दिल्ली आणि राजस्थानची नो बॉल वाली मॅच आठवत असेल. शुक्रवारी झालेल्या या थरारक सामन्यादरम्यान राजस्थानच्या गोलंदाजाचा एक बॉल कमरेच्या जवळपास फुलटॉस आला. हा बॉल नो बॉल द्यावा म्हणून दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आणि कोच प्रवीण आमरे मैदानात आले होते आणि त्यांनी पंचांशी वाद घालायला सुरुवात केली होती. मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यावर ऋषभ पंतने आपल्या खेळाडूंना डग आऊटमध्ये येण्यासाठी इशारेही केले होते. त्यावेळेस मैदानात उभ्या असलेल्या पंचांनी परिस्थिती नीट हाताळली होती. ऋषभ पंत आणि प्रवीण आमरे यांना दंडही केला गेला होता हे सारं या निमित्ताने पाहायला मिळाल्याचं आठवणीत असेल. मात्र याच सामन्यादरम्यान कोच रिकी पॉन्टिंगनी काय केलं ते ही समोर आलंय.

काय केलं रिकी पॉन्टिंग यांनी 

हा सामना सुरु असताना पॉन्टिंग मैदानात नव्हता. पॉन्टिंगच्या कुटुंबियांना करोनाची बाधा झाली होती, त्यामुळे तो हा सामना सुरु असताना हॉटेलमध्येच थांबला होता. त्यावेळी पॉन्टिंगने हॉटेलमध्ये जोरदार राडा घातल्याची बातमी आता समोर आली आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने अखेरच्या षटकात गमावला होता. हा सामना सुरु असताना पॉन्टिंगने हॉटेलच्या रुममध्येच राडा घातला होता. पॉन्टिंगला यावेळी एवढा राग येत होता की, त्याने टीव्हीचे ३-४ रिमोट आपटून आपटून तोडून टाकले. त्याचबरोबर हॉटेल रुममधील पाण्याच्या बाटल्या पॉन्टिंग भिंतीवरती भिरकावत होता. रुममध्ये हाताला जी गोष्ट येईल ती तो भिंतींवर आदळत असल्याचा आता खुलासा झाला आहे . खुद्द या गोष्टीचा खुलासा रिकी पॉन्टिंगनेही केला आहे. हा सामना दिल्ली जिंकू शकली असती .  या सामन्याच्या अखेरच्या षटकात नो बॉलचे वादग्रस्त प्रकरण घडले. त्यामुळे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांना एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. सामनाधिकाऱ्यांनी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतवर कडक कारवाई करत त्याला सामन्याच्या शुल्काची १०० टक्के रक्कम दंड म्हणून भरण्यास सांगितली आहे. मात्र आता रिकी पॉन्टिंगनेही हॉटेलचं मोठं नुकसान केल्यानं त्याच्यावर काय कारवाई होणार का याकडे लक्ष लागलं आहे.

विभाग

पुढील बातम्या