मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलणार?, बीसीसीआय मोठ्या निर्णयाच्या तयारीत

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलणार?, बीसीसीआय मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Aug 04, 2023, 05:04 PM IST

    • ICC Cricket World Cup 2023 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
IND vs PAK Match In ICC Cricket World Cup 2023 (HT)

ICC Cricket World Cup 2023 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

    • ICC Cricket World Cup 2023 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

IND vs PAK Match In ICC Cricket World Cup 2023 : ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. यंदाचा विश्वचषक भारतात होणार असल्याने त्यासाठी बीसीसीआयकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना पाच ऑक्टोबरला न्यूझीलंड संघाशी होणार आहे. त्यानंतर १५ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तानची हायहोल्टेड मॅच होणार आहे. त्यासाठी आतापासून भारतासह पाकिस्तानी चाहत्यांनी तयारी सुरू केली आहे. भारत-पाकिस्तानचा सामना अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याने अनेकांनी हॉटेल बुकिंग सुरू केली आहे. परंतु आता या सामन्याविषयीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी १५ ऑक्टोबरला नवरात्रीचा सण असल्याने संपूर्ण गुजरातमध्ये गरबा साजरा केला जाणार आहे. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीने या दिवशी भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्याची तारीख पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती तपास यंत्रणांनी बीसीसीआयला केल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच आयसीसी विश्वचषकाचं वेळापत्रक जारी करण्यात आलं होतं. परंतु आता त्यात कोणत्याही क्षणी बीसीसीआयकडून बदल केले जाणार असल्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तानचा सामना हा हाय-प्रोफाइल गेम असल्यामुळं बीसीसीआय देखील कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाहीय. त्यामुळं बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी २७ जुलै रोजी एक तात्काळ बैठक बोलावली आहे. त्यात भारत-पाक सामन्याची डेट बदलण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

१५ ऑक्टोबरला सामना होणं हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य राहणार नसल्याचं यंत्रणांकडून कळवण्यात आल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. भारत-पाक सामना पाहण्यासाठी केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून क्रिकेटप्रेमी अहमदाबादेत येणार आहे. त्यासाठी त्यांनी हॉटेल बुकिंग आणि अन्य नियोजनही करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळंच आम्ही यावर लवकरच अंतिम निर्णय घेणार असल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे. बीसीसीआय किंवा आयसीसीने अद्याप कोणत्याही सामन्यासाठी तिकिटांची विक्री सुरू केलेली नाही. त्यातच आता भारत-पाक सामन्याची तारीख बदलण्याची शक्यता असल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

पुढील बातम्या