मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asian Games 2023: फुटबॉल चाहत्यांसाठी गूड न्यूज; आशियाई गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी भारताला परवानगी

Asian Games 2023: फुटबॉल चाहत्यांसाठी गूड न्यूज; आशियाई गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी भारताला परवानगी

Jul 26, 2023, 08:44 PM IST

  • India national football team: भारतीय पुरुष आणि महिला फुटबॉल संघांना आशियाई क्रीडा २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी क्रीडा मंत्रालयाकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

India national football team

India national football team: भारतीय पुरुष आणि महिला फुटबॉल संघांना आशियाई क्रीडा २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी क्रीडा मंत्रालयाकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

  • India national football team: भारतीय पुरुष आणि महिला फुटबॉल संघांना आशियाई क्रीडा २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी क्रीडा मंत्रालयाकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

India national football team Participate Asian Games: चीनमध्ये होणार्‍या आगामी आशियाई क्रीडा 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय पुरूष आणि महिला फुटबॉल संघाला क्रिडा मंत्रालयाने परवानगी दिली आहे. याबाबत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकून यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. भारतीय फुटबॉल संघाची अलीकडची कामगिरी पाहता नियम शिथिल करून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिमॅक यांनी काही दिवसांपूर्वी क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहिले होते. भारतीय संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे् केली होती. महत्त्वाचे म्हणजे, क्रीडा मंत्रालायच्या नियमानुसार, भारताचे पुरुष आणि महिला फुटबॉल संघ आतापर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकत नव्हता. कारण, भारतीय पुरुष आणि महिला फुटबॉल संघ टॉप- ८ मध्ये नाही. परंतु, भारतीय संघाची अलीकडची कामगिरी पाहून क्रीडा मंत्रालयाने नियम शिथिल करून त्यांना विशेष सूट देण्याचा निर्णय घेतला.

भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले राष्ट्रीय संघ पुरुष आणि महिला दोन्ही खेळताना दिसतील. भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाने दोन्ही संघांच्या सहभागाबाबत नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडच्या काळातील त्यांची चांगली कामगिरी लक्षात घेऊन मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मला खात्री आहे की, आता हे संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करतील.”

भारतीय पुरुष फुटबॉल संघाने अलीकडेच एसएएफएफ चॅम्पियनशिपमधील अंतिम सामन्यात कुवेतच्या संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करून ट्रॉफी जिंकली. याशिवाय, गेल्या वर्षभरात संघाने मैदानावर चांगली कामगिरी केली आहे. यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय फुटबॉल संघ कशी कामगिरी बजावतो? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.

विभाग

पुढील बातम्या