मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Dutee Chand Marriage: धावपटू दुती चंद हिनं केलं मुलीसोबत लग्न? फोटो व्हायरल होताच...

Dutee Chand Marriage: धावपटू दुती चंद हिनं केलं मुलीसोबत लग्न? फोटो व्हायरल होताच...

Dec 03, 2022, 01:12 PM IST

    • Dutee Chand marriage rumours with girlfriend Monalisa: दुती चंदने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर युजर्सनी या पोस्टवर विविध कमेंट्स केल्या आहेत. तसेच, या भारतीय स्टार धावपटूचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. पण
Dutee Chand Marriage

Dutee Chand marriage rumours with girlfriend Monalisa: दुती चंदने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर युजर्सनी या पोस्टवर विविध कमेंट्स केल्या आहेत. तसेच, या भारतीय स्टार धावपटूचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. पण

    • Dutee Chand marriage rumours with girlfriend Monalisa: दुती चंदने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर युजर्सनी या पोस्टवर विविध कमेंट्स केल्या आहेत. तसेच, या भारतीय स्टार धावपटूचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. पण

भारताची स्टार स्प्रिंटर दुती चंदने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून या फोटोंची प्रचंड चर्चा रंगली आहे. वास्तविक, दुती चंद समलैंगिक आहे, हे तिने यापूर्वी अनेकदा मान्य केले आहे. यावेळी तिने तिची गर्लफ्रेंड मोनालिसासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दुती चंद सूटमध्ये दिसत आहे. तर तिची गर्लफ्रेंड मोनालिसाने लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. दोघीही लग्नाच्या वेषात स्टेजवर वधू-वरांप्रमाणे खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. हे फोटोंवरून दोघींनी लग्न केल्याचे दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दुती चंदने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर युजर्सनी या पोस्टवर विविध कमेंट्स केल्या आहेत. तसेच, या भारतीय स्टार धावपटूचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. पण चाहत्यांमध्ये अजूनही एक सस्पेन्स आहे की दोघींचं खरंच लग्न झालंय की हे फक्त फोटोशूट आहे.

दुतीचे लग्न झाले नाही

दरम्यान, हे फोटो दुती चंदच्या लग्नाचे नाही तर तिच्या बहिणीच्या लग्नातील आहेत. दुतीने तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले होते. सोबत तिने कॅप्शनमध्ये आपल्या बहिणीचे लग्न झाल्याचे सांगितले आहे. यावरून हे फोटो दुती चंदच्या लग्नाचे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कुटूंबिय दुती चंदच्या विरोधात

ओडिशाची रहिवासी असलेल्या दुतीचा जन्म जिजापूर जिल्ह्यातील चका गोपालपूर गावात झाला. तिने देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत. समलैंगिक संबंधांचा खुलासा झाल्यानंतर अॅथलीट दुती चंदला तिच्याच गावात विरोधाचा सामना करावा लागला. दुती चंदचे कुटुंबही तिच्यासोबत नाही.

तिच्या समलैंगिक संबंधाचा खुलासा झाल्यानंतर आणि घरच्यांच्या विरोधानंतर दुती चंद म्हणाली होती की, 'ते मला पुरुषाशी लग्न करून मुले जन्माला घालण्यास सांगत आहेत. त्यांना फक्त याच परंपरेची माहिती आहे. पण मी ज्या शहरात शिकले, तिथे सगळे मला साथ देत आहेत. माझे कुटुंब आणि गाव माझ्यासोबत येईल की नाही हे मला माहीत नाही. हे पाहण्यासाठी मला प्रतीक्षा करावी लागेल".

पुढील बातम्या