मराठी बातम्या  /  क्रीडा  /  इन्स्टावर ओळख, लग्नाचं आमिष देत बलात्कार, अर्जुन पुरस्कार मिळालेल्या खेळाडूवर बलात्काराचा गुन्हा

इन्स्टावर ओळख, लग्नाचं आमिष देत बलात्कार, अर्जुन पुरस्कार मिळालेल्या खेळाडूवर बलात्काराचा गुन्हा

Feb 06, 2024, 09:01 PM IST

    • POCSO Case Against varun kumar : वरुण कुमार हिमाचलचा रहिवासी आहे. पण काही वर्षांपूर्वी हॉकीसाठी तो पंजाबमध्ये आला. त्याने २०१७ मध्ये भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण केले.
POCSO Case Against varun kumar

POCSO Case Against varun kumar : वरुण कुमार हिमाचलचा रहिवासी आहे. पण काही वर्षांपूर्वी हॉकीसाठी तो पंजाबमध्ये आला. त्याने २०१७ मध्ये भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण केले.

    • POCSO Case Against varun kumar : वरुण कुमार हिमाचलचा रहिवासी आहे. पण काही वर्षांपूर्वी हॉकीसाठी तो पंजाबमध्ये आला. त्याने २०१७ मध्ये भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण केले.

hockey player varun kumar rape case : भारतीय हॉकी संघाचा स्टार खेळाडू वरुण कुमार अडचणीत सापडला आहे. भारताचा स्टार बचावपटू वरुण कुमारने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार वरुण कुमारवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

बंगळुरूमधील ज्ञानभारती पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली

पीडितेने आरोप केला आहे, की वरुण कुमारने ती केवळ १७ वर्षांची असताना तिचा शारीरिक छळ केला. सोबतच पीडितेने वरुण कुमारवर लग्नाचे आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे.

पीडित मुलीने तक्रारीत म्हटले, की २०१९ मध्ये जेव्हा ती वरुणला भेटली तेव्हा ती १७ वर्षांची होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती हॉकीपटू वरुणला भेटली. यावेळी वरुण भारतीय क्रीडा प्राधिकरणात (SAI) प्रशिक्षण घेत होता. 

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या जालंधर येथील निवासस्थानावर छापा टाकला. वास्तविक, वरुण मूळचा हिमाचल प्रदेशचा आहे, पण तो जालंधरमध्ये राहतो.

पोलीस काय म्हणाले?

याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे, 'वरूण सध्या फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांना दिलेल्या जबानीत पीडितेने सांगितले की, वरुण जेव्हा जेव्हा बंगळुरूला यायचा तेव्हा तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा. आता पीडिता २२ वर्षांची आहे, पण दोघांची पहिली भेट ती १७ वर्षांची असताना झाली होती.

वरुण कुमारला २०१८ मध्ये अर्जुन पुरस्कार

वरुण कुमार हिमाचलचा रहिवासी आहे. पण काही वर्षांपूर्वी हॉकीसाठी तो पंजाबमध्ये आला. त्याने २०१७ मध्ये भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण केले. २०२२ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने रौप्य पदक जिंकले होते, तो त्या संघाचा भाग होता. याशिवाय २०२२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही तोभाग होता. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्यपदक जिंकले, त्या संघाचाही वरुण भाग होता.

वरुण कुमारला २०२१ मध्ये अर्जुन पुरस्कारही देण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वरुण कुमार आणि पीडिता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एकमेकांना भेटले. दोघांची ओळख झाली तेव्हा पीडिता अवघी १७ वर्षांची होती. 

पुढील बातम्या