मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WTC 2023: डब्लूटीसी गमावताच गांगुली भारतीय खेळाडूंवर भडकला; धोनी, गंभीरचं नाव घेत दाखवला आरसा!

WTC 2023: डब्लूटीसी गमावताच गांगुली भारतीय खेळाडूंवर भडकला; धोनी, गंभीरचं नाव घेत दाखवला आरसा!

Jun 13, 2023, 05:19 PM IST

  • Sourav Ganguly: डब्लूटीसी गमवल्यानंतर सौरव गांगुलीने भारतीय खेळाडूंना चांगलच झापलं आहे.

Sourav Ganguly

Sourav Ganguly: डब्लूटीसी गमवल्यानंतर सौरव गांगुलीने भारतीय खेळाडूंना चांगलच झापलं आहे.

  • Sourav Ganguly: डब्लूटीसी गमवल्यानंतर सौरव गांगुलीने भारतीय खेळाडूंना चांगलच झापलं आहे.

IND vs AUS: इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळण्यात आलेल्या डब्लूटीसीच्या अंतिम सामन्यात भारताला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागले. या सामन्यात भारतीय संघाच्या खेळाडूला काही खास कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिलेल्या ४४४ धावांचा पाठलाग करताना भारताला २५० धावांचा टप्पा गाठता आला नाही. अवघ्या २३४ धावांवर भारताचा संपूर्ण संघ पव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज संघाचा डाव पुढे नेण्यास अपयशी ठरले. या सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची संतापजनक प्रतिक्रिया समोर आली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना गमावल्यानंतर सौरव गांगुलीने स्पोर्ट्सशी बोलताना भारतीय फलंदाजांबद्दल प्रतिक्रिया दिली. सौरव गांगुली म्हणाले की, “भारतीय खेळाडूंना सामना जिंकणारे प्रदर्शन करावे लागेल. जसे या सामन्यात स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी केले. तसेच २०११ च्या विश्वचषकात महेंद्रसिंह धोनी आणि गौतम गंभीर यांनी केले होते. मोठे सामने जिंकण्यासाठी खेळाडूंना ९०-१०० धावा कराव्या लागतील. ज्याप्रकारे रिकी पाँटिंगने २००३ मध्ये केले होते,२०२३ मध्ये इथे स्मिथ आणि हेडने केले.”

"भारतीय खेळाडूंना भविष्यात मोठे सामने जिंकायचे आहेत तर, कसोटीच्या कोणत्याही एका डावात ३५०- ४०० धावांचा आकडा गाठणे आवश्यक आहे. नाहीतर विजय हातातून निसटून जाईल. अशा पद्धतीने तुम्ही एक दोन सामने जिंकू शकतात. पण, मोठे सामने जिंकता येणार नाही", असेही सौरव गांगुली यांनी म्हटले आहे.

विभाग

पुढील बातम्या