मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Football Match : छोट्या चुका महागात पडल्या, भारताचा थोडक्यात पराभव, किंग्स कपचं फायनल खेळण्याचं स्वप्न भंगले

Football Match : छोट्या चुका महागात पडल्या, भारताचा थोडक्यात पराभव, किंग्स कपचं फायनल खेळण्याचं स्वप्न भंगले

Sep 07, 2023, 08:43 PM IST

    • kings cup 2023 india footbal match : या सामन्यात टीम इंडिया मोठा उलटफेर करणार होती, पण अखेरच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे त्यांचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले. निर्धारित ९० मिनिटे सामना २-२ असा बरोबरीत राहिल्यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. तिथे भारताचा ४-५ असा पराभव झाला.
kings cup 2023 india footbal match

kings cup 2023 india footbal match : या सामन्यात टीम इंडिया मोठा उलटफेर करणार होती, पण अखेरच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे त्यांचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले. निर्धारित ९० मिनिटे सामना २-२ असा बरोबरीत राहिल्यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. तिथे भारताचा ४-५ असा पराभव झाला.

    • kings cup 2023 india footbal match : या सामन्यात टीम इंडिया मोठा उलटफेर करणार होती, पण अखेरच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे त्यांचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले. निर्धारित ९० मिनिटे सामना २-२ असा बरोबरीत राहिल्यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. तिथे भारताचा ४-५ असा पराभव झाला.

भारतीय फुटबॉल संघाला गुरुवारी (७ सप्टेंबर) किंग्ज कपच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. थायलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या ४९व्या किंग्स कपच्या उपांत्य फेरीत भारताचा इराकविरुद्ध पराभव झाला. फिफा क्रमवारीत इराक ७०व्या तर भारत ९९व्या क्रमांकावर आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

या सामन्यात टीम इंडियाचा मोठा उलटफेर करणार होता, मात्र अखेरच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे टीम इंडियाचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले. निर्धारित ९० मिनिटे सामना २-२ असा बरोबरीत राहिल्यानंतर सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटमध्ये झाला. तिथे भारतीय संघाचा ४-५ असा पराभव झाला.

भारतासाठी नौरेम महेश सिंगने सामन्याच्या १६व्या मिनिटाला पहिला गोल केला. या गोलमुळे भारताने १-० अशी आघाडी घेतली. २८व्या मिनिटाला इराकला पेनल्टी मिळाली. याचा फायदा त्यांनी घेतला. इराकसाठी अल हमदीने गोल करत संघाला बरोबरीत आणले. हाफ टाईमपर्यंत १-१ अशी बरोबरी होती. यानंतर ५१व्या मिनिटाला भारतीय संघाने पुन्हा आघाडी घेतली. मनवीरने संघासाठी दुसरा गोल केला. भारतीय संघाने पुन्हा एकदा सामन्यात आघाडी घेतली.

टीम इंडियाला आघाडीचे विजयात रुपांतर करता आले नाही

टीम इंडियाला दुसऱ्यांदा आघाडी मिळाली तेव्हा सामना जिंकणार असे वाटत होते, पण इराकच्या खेळाडूंनी अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतला. ७९व्या मिनिटाला इराकचा खेळाडू आयमानने पेनल्टी मिळवत संघाच्या बाजूने गोल केला. भारतीय बचावपटूच्या चुकीचा फायदा त्याला मिळाला. इराकने ८०व्या मिनिटाला सामना बरोबरीत आणला. त्यांच्यासाठी आयमेनने शानदार गोल केला. सामन्यात दोन वेळा आघाडी घेतल्यानंतरही संघाला निर्धारित वेळेत विजय मिळवता आला नाही.

भारताच्या ब्रँडन फर्नांडिसने पेनल्टी शूटआऊट मिस केला

निर्धारित ९० मिनिटे सामना २-२ असा बरोबरीत राहिला. येथून पेनल्टी शूटआऊटमध्ये सामन्याचा निकाल लागला. भारत आणि इराकच्या प्रत्येकी ५ खेळाडूंनी शॉट्स घेतले. १० खेळाडूंपैकी फक्त एका खेळाडूला गोलपोस्टवर चेंडू मारता आला नाही आणि तो म्हणजे भारताचा ब्रँडन फर्नांडिस. त्याचा फटका गोल पोस्टवर आदळल्यानंतर परत आला. इराकने पेनल्टीवर ५-४ असा सामना जिंकला.

भारत अद्याप अंतिम फेरीत पोहोचलेला नाही

१९६८ मध्ये थायलंडमध्ये किंग्स कप सुरू झाला. तेव्हापासून भारत अद्याप अंतिम फेरीत पोहोचू शकलेला नाही. १९७७ आणि २०१९ मध्ये भारत तिसरा राहिला. यावेळीही संघाला तिसरे स्थान मिळवण्याची संधी असेल. तिसर्‍या क्रमांकासाठी १० सप्टेंबर रोजी थायलंड किंवा लेबनॉनशी सामना होईल.

विभाग

पुढील बातम्या