मराठी बातम्या  /  क्रीडा  /  India Vs Malaysia Hockey Final : भारतानं एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, थरारक फायनलमध्ये मलेशियाचा ४-३ ने धुव्वा

India Vs Malaysia Hockey Final : भारतानं एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, थरारक फायनलमध्ये मलेशियाचा ४-३ ने धुव्वा

Aug 12, 2023, 10:35 PM IST

  •  Asian Champions Trophy 2023 Final : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद भारतीय हॉकी संघाने पटकावले आहे. फायनलमध्ये टीम इंडियाने मलेशियाचा ४-३ ने धुव्वा उडवला.

India Vs Malaysia Hockey Final

Asian Champions Trophy 2023 Final : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद भारतीय हॉकी संघाने पटकावले आहे. फायनलमध्ये टीम इंडियाने मलेशियाचा ४-३ ने धुव्वा उडवला.

  •  Asian Champions Trophy 2023 Final : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद भारतीय हॉकी संघाने पटकावले आहे. फायनलमध्ये टीम इंडियाने मलेशियाचा ४-३ ने धुव्वा उडवला.

चेन्नई येथे खेळल्या जात असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद भारतीय हॉकी संघाने पटकावले आहे. रोमहर्षक फायनलमध्ये भारत एका टप्प्यावर ३-१ ने पिछाडीवर होता, त्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये एका मिनिटात दोन गोल करत जबरदस्त पुनरागमन केले. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

चौथ्या क्वार्टरमध्ये चौथा गोल करत भारतीय संघाने हा सामना ४-३ असा जिंकून चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला. यानंतर आता भारत हा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक वेळा जिंकणारा देश बनला आहे. पाकिस्तानने तीन वेळा हे विजेतेपद पटकावले आहे.

यापूर्वी भारताने २०११, २०१६आणि २०१८ मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. २०१८ मध्ये भारत आणि पाकिस्तान संयुक्त विजेते होते, कारण अंतिम सामना रद्द झाला होता. टीम इंडिया पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा चॅम्पियन बनली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. भारतीय हॉकी संघाला आता हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. अशा स्थितीत या विजयाने भारतीय खेळाडूंचे मनोबल नक्कीच उंचावले असेल.

हाफ टाइमपर्यंत भारताचा खराब खेळ

हाफ टाइमपर्यंत मलेशियाचा संघ ३-१ ने आघाडीवर होता.  त्याआधी जुगराज सिंगने नवव्या मिनिटाला गोल करत भारतीय संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, त्यानंतर भारतीय संघाची कामगिरी घसरली आणि मलेशियाने प्रतिआक्रमण सुरूच ठेवले. १४व्या मिनिटाला अझराई अबू कमालने केलेल्या फील्ड गोलच्या जोरावर मलेशियाने बरोबरी साधली.

यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये १८व्या मिनिटाला राहीझ राजीने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि २८व्या मिनिटाला मोहम्मद अमिनुद्दीनने पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅगफ्लिक करून आपल्या संघाला भारताविरुद्ध ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये भारताने काही सोपे पेनल्टी कॉर्नरही गमावले.

तिसऱ्या-चौथ्या क्वार्टरमध्ये टीम इंडियाचे पुनरागमन

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने जबरदस्त पुनरागमन केले. भारतीय संघाने एका मिनिटात दोन गोल करत स्कोअर ३-३ केला. हाफ टाईमनंतरही भारताने प्रतिआक्रमण सुरूच ठेवले. सामन्याच्या ४५व्या मिनिटाला भारताच्या काउंटर अॅटॅकवर मलेशियाने फाऊल केला, यावर रेफ्रींनी भारताला पेनल्टी स्ट्रोक दिला. यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत स्कोअर ३-२ असा केला.

त्याच मिनिटाला गुरजंत सिंगने काउंटर अटॅकवर मैदानी फील्ड करत स्कोअर ३-३ असा केला. चौथ्या क्वार्टरच्या ५६व्या मिनिटाला भारतीय संघाने चौथा गोल केला. आकाशदीप सिंगने प्रतिआक्रमण करत उत्कृष्ट फील्ड गोल केला . अशाप्रकारे टीम इंडिया चॅम्पियन ठरली.

पुढील बातम्या