मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND Vs WI T20 : वेस्ट इंडिज क्रिकेटची घोडचूक, मैदानात आलेल्या खेळाडूंना बाहेर पडावं लागलं

IND Vs WI T20 : वेस्ट इंडिज क्रिकेटची घोडचूक, मैदानात आलेल्या खेळाडूंना बाहेर पडावं लागलं

Aug 08, 2023, 09:00 PM IST

    • IND vs WI Guyana T20 Match : भारत-वेस्ट इंडिज तिसर्‍या T20 सामन्यादरम्यान एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. एका क्षुल्लक कारणासाठी मैदानात आलेल्या भारत आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना पुन्हा बाहेर जावे लागले.
IND Vs WI T20

IND vs WI Guyana T20 Match : भारत-वेस्ट इंडिज तिसर्‍या T20 सामन्यादरम्यान एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. एका क्षुल्लक कारणासाठी मैदानात आलेल्या भारत आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना पुन्हा बाहेर जावे लागले.

    • IND vs WI Guyana T20 Match : भारत-वेस्ट इंडिज तिसर्‍या T20 सामन्यादरम्यान एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. एका क्षुल्लक कारणासाठी मैदानात आलेल्या भारत आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना पुन्हा बाहेर जावे लागले.

 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

ind vs wi t20 match 30 yard circle incident : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा T20 सामना आज (८ ऑगस्ट) गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर सुरू आहे. वेस्ट इंडिज संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने वेस्ट इंडिजने जिंकले आहेत. हा सामना जिंकून मालिकेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ मैदानावर उतरला आहे. त्याचबरोबर हा सामना जिंकून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे.

दरम्यान, भारत-वेस्ट इंडिज तिसर्‍या T20 सामन्यादरम्यान एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. एका क्षुल्लक कारणासाठी मैदानात आलेल्या भारत आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना पुन्हा बाहेर जावे लागले.

वास्तविक, ३० यार्ड सर्कलमुळे खेळ थांबल्याचे तुम्ही कधी पाहिले किंवा ऐकले आहे का? होय, भारत-वेस्ट इंडिजच्या तिसर्‍या T20 सामन्यादरम्यान हे घडले आहे. खरे तर गयानामधील ग्राउंड स्टाफ ३० यार्ड सर्कल तयार करायले विसरले. ३० यार्ड सर्कल नसल्यामुळे भारत-वेस्ट इंडिजचा तिसरा काही वेळ उशीराने सुरू झाला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असेल. आता सोशल मीडियावर हा प्रसंग चर्चेचा विषय बनला आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया

यशस्वी जैस्वालचे टी-20 पदार्पण

दुसरीकडे, या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून मैदानात उतरला आहे. वास्तविक, भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये इशान किशनच्या जागी यशस्वी जैस्वालचा समावेश केला आहे. यशस्वी जैस्वालने पदार्पणाच्या कसोटीत शानदार शतक झळकावले होते. मात्र, आता यशस्वी जैस्वाल आपल्या टी-20 पदार्पणात कशी कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत: शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज: ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (सी), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.

पुढील बातम्या