मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asian Games 2023 hockey : भारताने उझबेकिस्तानला चिरडलं, टीम इंडियाने केले १६ गोल

Asian Games 2023 hockey : भारताने उझबेकिस्तानला चिरडलं, टीम इंडियाने केले १६ गोल

Sep 24, 2023, 11:44 AM IST

    • Asian Games 2023 hockey : भारतीय पुरुष हॉकी संघाने उझबेकिस्तानविरुद्ध १६-० अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. भारताकडून मनप्रीत, ललित आणि वरुणने हॅट्ट्रिक केली.
Asian Games 2023 hockey

Asian Games 2023 hockey : भारतीय पुरुष हॉकी संघाने उझबेकिस्तानविरुद्ध १६-० अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. भारताकडून मनप्रीत, ललित आणि वरुणने हॅट्ट्रिक केली.

    • Asian Games 2023 hockey : भारतीय पुरुष हॉकी संघाने उझबेकिस्तानविरुद्ध १६-० अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. भारताकडून मनप्रीत, ललित आणि वरुणने हॅट्ट्रिक केली.

india vs Uzbekistan Asian Games 2023 hockey : हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने उझबेकिस्तानचा १६-० असा पराभव करून आपल्या एशियन गेम्स 2023 मोहिमेची शानदार सुरुवात केली. भारताकडून ललित उपाध्यायने सर्वाधिक ४ गोल केले. तर वरुण कुमार आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी ३ गोल केले. आता पुढील सामन्यात भारताचा सामना सिंगापूरशी होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

भारताने आतापर्यंत ५ पदके जिंकली

१० मीटर एअर रायफल टीम इव्हेंट (शूटिंग): रौप्य

पुरुषांची लाइटवेट डबल स्कल्स (रोइंग): रौप्य

पुरुष कॉक्सलेस दुहेरी (रोइंग): कांस्य

पुरुष कॉक्सड ८ संघ (रोइंग): रौप्य

महिला १० मीटर एअर रायफल (शूटिंग): कांस्य

टेबल टेनिस, ई-स्पोर्ट्समध्ये, रग्बीमध्ये भारताची निराशा

महिलांच्या टेबल टेनिस सांघिक स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. राऊंड-१६ मध्ये भारतीय संघाचा थायलंडकडून ३-१ असा पराभव झाला.

यानंतर ई-स्पोर्ट्समध्येही भारताच्या चरण जोत सिंगला राऊंड-३२ मध्ये चीनच्या लिऊ जियाचेंगकडून ०-२ ने पराभव पत्करावा लागला. तर करमन सिंगला बहरीनच्या अब्दुलअजीज फकीहीने २-१ ने पराभूत केले.

महिलांच्या रग्बी सेव्हन्समध्ये भारताला त्यांच्या पहिल्या गट टप्प्यातील सामन्यात हाँगकाँगविरुद्ध ०-३८ असा पराभव पत्करावा लागला आहे. भारताचा पुढील सामना सध्याच्या चॅम्पियन जपानशी होणार आहे.

पुढील बातम्या