मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind vs SA Weather Update: भारत-आफ्रिका निर्णायक वनडेत पाऊस ठरणार व्हिलन? असं असेल दिल्लीचं हवामान

Ind vs SA Weather Update: भारत-आफ्रिका निर्णायक वनडेत पाऊस ठरणार व्हिलन? असं असेल दिल्लीचं हवामान

Oct 10, 2022, 09:10 PM IST

    • india vs south africa odi 3rd match weather report: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही पावसामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात. 
Ind vs SA Weather Update

india vs south africa odi 3rd match weather report: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही पावसामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात.

    • india vs south africa odi 3rd match weather report: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही पावसामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना मंगळवारी (११ ऑक्टोबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल. मालिका जिंकण्यासाठी भारताला तिसऱ्या वनडेत कोणत्याही परिस्थितीत विजयाची नोंद करावी लागेल. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

या मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये खेळला गेला. हा सामना पावसामुळे ४०-४० षटकांचा खेळवला गेला. त्या सामन्यात भारतीय संघाला ९ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला.

त्यामुळे आता या मालिकेतील शेवटचा सामना निर्णायक असेल. हा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल. दिल्लीचे हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.

दिल्लीतील हवामान

दिल्लीत गेल्या आठवडाभरापासून पाऊस पडत आहे. तसेच, हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत सामन्याच्या दिवशी म्हणजेच १० ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० वाजेपर्यंत ४० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. आकाश ढगाळ असेल. त्यामुळे निर्णायक सामना पावसामुळे वाहून जाऊ शकतो. या सामन्याबाबत अद्याप स्पष्टपणे काहीही सांगता येणार नाही. मात्र, सामन्याच्या दिवशी दिल्लीतील वातावरणाचा मूड काय असेल हे पाहावे लागेल. याशिवाय वाऱ्याचा वेग ताशी २० किमी राहील. सामन्यादरम्यान तापमान २१ ते २९ अंश सेल्सिअस राहू शकते.

पीच रिपोर्ट

अरुण जेटली स्टेडियममध्ये मार्च २०१९ पासून एकही एकदिवसीय सामना आयोजित केलेला नाही. येथे गेल्या तीन सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २५९ आहे आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तीनही सामने जिंकले आहेत. या मैदानावर आतापर्यंत २६ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या मैदानावर केवळ दोनदाच संघाने ३०० चा टप्पा पार केला आहे. या मैदानावर भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या २८९/६ आहे.

दिल्लीच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसोबतच फिरकीपटूंनाही पुरेशी मदत मिळते. भारताने येथे २१ पैकी १२ एकदिवसीय सामने जिंकले आहेत. गेल्या दोन वनडेत टीम इंडियाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आहे. या वर्षी जूनमध्ये या मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियासोबत टी-20 सामना खेळला होता, ज्यामध्ये आफ्रिकेच्या संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता.

पुढील बातम्या