मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind vs SA ODI: तिसरा एकदिवसीय सामना होणार का?; काय आहे हवामानाचा आजचा अंदाज?

Ind vs SA ODI: तिसरा एकदिवसीय सामना होणार का?; काय आहे हवामानाचा आजचा अंदाज?

Oct 11, 2022, 01:24 PM IST

  • Ind vs SA ODI: भारत व दक्षिण आफ्रिका क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या व निर्णायक सामन्यावर पावसाचं सावट आहे.

India Vs South Africa

Ind vs SA ODI: भारत व दक्षिण आफ्रिका क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या व निर्णायक सामन्यावर पावसाचं सावट आहे.

  • Ind vs SA ODI: भारत व दक्षिण आफ्रिका क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या व निर्णायक सामन्यावर पावसाचं सावट आहे.

India vs South Africa 3rd ODI Weather Report: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा व निर्णायक एकदिवसीय सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र, मागील दोन-तीन दिवसांपासून दिल्लीत पाऊस पडत असल्यामुळं आजचा सामना होईल की नाही, याबाबत साशंकता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दिल्लीत अधूनमधून सातत्यानं पावसाच्या सरी कोसळत आहेत. आजच्या सामन्यातही पावसाचा अडथळा येण्याची दाट शक्यता आहे. आजचं हवामान कसं आहे हे पाहणंही महत्त्वाचं आहे. 'दिल्लीत आज पावसाची शक्‍यता आहे, मात्र दिवसअखेरीस वातावरण निवळलेलं असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे आणि अशा परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. पूर्वनियोजित वेळेनुसार सामना दुपारी १.३० वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी १ वाजता होणार आहे.

दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत पावसाची शक्‍यता आहे, मात्र चार वाजेनंतर पावसाची शक्‍यता कमी आहे. त्यामुळं काही षटकांचा खेळ खराब होऊ शकतो, मात्र सामना होईल अशी आशा आहे.

भारताचा संभाव्य संघ असा: शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान.

पुढील बातम्या