मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs Eng Hockey : भारतासमोर आज इंग्लंडचं आव्हान, दोन्ही संघांच्या नजरा क्वार्टर फायनलकडे

IND vs Eng Hockey : भारतासमोर आज इंग्लंडचं आव्हान, दोन्ही संघांच्या नजरा क्वार्टर फायनलकडे

Jan 15, 2023, 01:44 PM IST

    • india vs england hockey world cup 2023 : हॉकी विश्वचषकात रविवारी टीम इंडियाचा दुसरा सामना इंग्लंडशी होणार आहे. टीम इंडियाने स्पेनचा २-० असा पराभव करून विश्वचषक मोहिमेची शानदार सुरुवात केली.
india vs england hockey world cup

india vs england hockey world cup 2023 : हॉकी विश्वचषकात रविवारी टीम इंडियाचा दुसरा सामना इंग्लंडशी होणार आहे. टीम इंडियाने स्पेनचा २-० असा पराभव करून विश्वचषक मोहिमेची शानदार सुरुवात केली.

    • india vs england hockey world cup 2023 : हॉकी विश्वचषकात रविवारी टीम इंडियाचा दुसरा सामना इंग्लंडशी होणार आहे. टीम इंडियाने स्पेनचा २-० असा पराभव करून विश्वचषक मोहिमेची शानदार सुरुवात केली.

हॉकी विश्वचषकात टीम इंडियाने शानदार सुरुवात केली असून पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने स्पेनचा पराभव केला. स्पेनवर धुळ चारून आपल्या मोहिमेची चांगली सुरुवात केल्यानंतर, भारत रविवारी (१५ जानेवारी) FIH पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या दुसऱ्या पूल सामन्यात इंग्लंडला भिडणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सामना सुरू होईल.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

बिरसा मुंडा स्टेडियमवर पूल-डीच्या पहिल्या सामन्यात शुक्रवारी भारताने स्पेनचा २-० असा पराभव केला होता. पण आजचा सामना इंग्लंडविरुद्धचा सामना भारतासाठी कठीण असणार आहे. कारण इंग्लंडनेही वेल्सविरुद्ध ५-० असा एकतर्फी विजय मिळवून या स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे.

जागतिक क्रमवारीत इंग्लंड भारताच्या एका स्थानाने पुढे आहे. परंतु गेल्या काही वर्षांत दोन्ही संघांच्या कामगिरीत फारसा फरक पडलेला नाही. गेल्या वर्षी दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध ३ सामने खेळले होते. कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोघांमधील सामना ४-४ असा बरोबरीत राहिला होता. त्यानंतर FIH प्रो लीगच्या पहिल्या फेरीतील दोघांमधील सामना ३-३ असा बरोबरीत सुटला. तर दुसरा सामना भारताने ४-३ असा जिंकला होता.

भारताने इंग्लंडविरुद्ध १० सामने जिंकले आहेत, तर इंग्लंड संघाने केवळ ७ सामने जिंकले असून ४ सामने अनिर्णित राहिले आहेत. रविवारी पूल डीच्या दुसर्‍या सामन्यात स्पेनचा सामना वेल्सशी होणार आहे.

भारतीय संघ-

गोलरक्षक: क्रिशन बी पाठक आणि पीआर श्रीजेश

डिफेंडर्स: हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, सुरेंदर कुमार, वरुण कुमार, जर्मनप्रीत सिंग आणि नीलम संजीव

मिडफिल्डर: विवेक सागर प्रसाद, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग आणि आकाशदीप सिंग

फॉरवर्ड्स: मनदीप सिंग, ललित उपाध्याय, अभिषेक आणि सुखजित सिंग

पर्यायी खेळाडू: राजकुमार पाल आणि जुगराज सिंग.

 

पुढील बातम्या