मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind vs Ban ODI : निर्णायक वनडे टाय! ६ चेंडूत ३ धावा करता आल्या नाहीत, टीम इंडियाची इंडियाची लाजिरवाणी कामगिरी

Ind vs Ban ODI : निर्णायक वनडे टाय! ६ चेंडूत ३ धावा करता आल्या नाहीत, टीम इंडियाची इंडियाची लाजिरवाणी कामगिरी

Jul 22, 2023, 06:20 PM IST

    • ind w vs ban w match tie : भारत आणि बांगलादेश महिला संघातील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना टाय झाला. यामुळे मालिका १-१ बरोबरीत राहिली. तिसऱ्या सामन्यात भारत सहज विजयी होईल, असे वाटत होते मात्र बांगलादेशी गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केले.
india vs bangladesh women 3rd odi

ind w vs ban w match tie : भारत आणि बांगलादेश महिला संघातील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना टाय झाला. यामुळे मालिका १-१ बरोबरीत राहिली. तिसऱ्या सामन्यात भारत सहज विजयी होईल, असे वाटत होते मात्र बांगलादेशी गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केले.

    • ind w vs ban w match tie : भारत आणि बांगलादेश महिला संघातील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना टाय झाला. यामुळे मालिका १-१ बरोबरीत राहिली. तिसऱ्या सामन्यात भारत सहज विजयी होईल, असे वाटत होते मात्र बांगलादेशी गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केले.

india vs bangladesh women 3rd odi : भारत-बांगलादेश वनडे मालिकेतील शेवटचा सामना टाय झाला. या सामन्यात बरेच नाट्य पाहायला मिळाले. सामना शेवटच्या षटकात फसला, यानंतर सामना बरोबरीत राहिला. तत्पूर्वी, दोन्ही संघ प्रत्येकी एक सामना जिंकून मालिकेत बरोबरीत होते. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २२५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा डाव ४९.३ षटकांत २२५ धावांवरच संपुष्टात आला. अशाप्रकारे टीम इंडियाचा विजय अवघ्या १ धावेने हुकला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

भारताकडून हरलीन देओलने ७७ धावांची शानदार खेळी केली. तर स्नेह राणाने २ बळी घेतले. या मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने तर दुसरा सामना भारताने जिंकला होता.

शेवटच्या षटकात ३ धावांची गरज

गेल्या सामन्यात शानदार खेळ करणारी जेमिमा रॉड्रिग्ज ३३ धावांवर नाबाद राहिली. एकेकाळी टीम इंडियाचा स्कोर ६ बाद २१६ असा होता. त्यामुळे टीम इंडिया सहज विजय मिळवेल असे वाटत होते, पण यानंतर संघाच्या सलग ४ विकेट पडल्या आणि सामना बरोबरीत राहिला. भारताने शेवटचे ६ विकेट अवघ्या ३४ धावांत गमावल्या. हरमनप्रीत कौर १४, यास्तिका भाटिया ५ तर दीप्ती शर्मा १ हे महत्वाचे फलंदाज स्वस्तात बाद झाले.

भारतीय संघाकडून हरलीन कौरने ७७ आणि स्मृती मानधनाने ५९ धावा केल्या. बांगलादेशकडून नाहिदा अख्तरने ३ विकेट्स घेतल्या, शेवटी तिने २ विकेट घेत भारताच्या जबड्यातून सामना हिसकावून घेतला.

शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी अवघ्या ३ धावा हव्या होत्या. मैदानात जेमिमा आणि मेघना सिंग होत्या. पहिल्या दोन चेंडूवर दोघींनी एक-एक सिंगल घेतला. पण तिसऱ्या चेंडूवर मेघना सिंग झेलबाद झाली आणि भारताने हातातला सामना गमावला. टीम इंडिया ३ चेंडूआधीच सर्वबाद झाली.

बांगलादेशचा डाव

बांगलादेशकडून फरगाना हकने शतक (१०७) केले, हे बांगलादेशच्या महिला क्रिकेटपटूचे पहिले शतक आहे.

महिला वनडेमध्ये एक हजार पेक्षा जास्त धावा करणारी फरगाना हक ही एकमेव बांगलादेशी फलंदाज आहे. तिच्या शतकामुळेच निर्णायक सामन्यात बांगलादेशला ४ बाद २२५ धावा करता आल्या. बांगलादेशची ही एकदिवसीय क्रिकेटमधली दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे.

फर्गानाला शमीमा सुलतानाच्या शानदार अर्धशतकाने (५२) मदत केली, जे तिचे वनडेतील दुसरे अर्धशतक होते. बांगलादेशच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान उभे केले. मालिकेत पहिल्यांदाच पहिल्या पॉवरप्लेमध्ये एकही विकेट पडली नाही. वास्तविक शमीमा आणि फरगाना यांनी भारतीय गोलंदाजांचा जबरदस्त सामना केला. त्यानंतर बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना (२४) आणि शोभना मोस्त्रे (२२) यांनी दमदार खेळी केली. त्यामुळे बांगलादेशने २२५ धावा केल्या

 

पुढील बातम्या