मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Indian Relay Team : थरारक! भारतीय रिले संघाने रचला इतिहास, सर्व एशियन रेकॉर्ड मोडत फायनल गाठली

Indian Relay Team : थरारक! भारतीय रिले संघाने रचला इतिहास, सर्व एशियन रेकॉर्ड मोडत फायनल गाठली

Aug 27, 2023, 12:46 PM IST

    • Indian Relay Team athletics championship : भारताचा पुरुष संघ ४x४०० मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. मुहम्मद अनास याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश या भारतीय चौकडीने हे संस्मरणीय यश मिळवले. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आशियाई विक्रम मोडला.
Indian Relay Team

Indian Relay Team athletics championship : भारताचा पुरुष संघ ४x४०० मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. मुहम्मद अनास याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश या भारतीय चौकडीने हे संस्मरणीय यश मिळवले. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आशियाई विक्रम मोडला.

    • Indian Relay Team athletics championship : भारताचा पुरुष संघ ४x४०० मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. मुहम्मद अनास याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश या भारतीय चौकडीने हे संस्मरणीय यश मिळवले. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आशियाई विक्रम मोडला.

Indian Relay Team In World Athletics Championships 2023 : हंगेरीतील बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताच्या पुरुष संघाने या चॅम्पियनशिपच्या 4x400 मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघ प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

मुहम्मद अनास याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश या भारतीय चौकडीने हे संस्मरणीय यश मिळवले. भारतीय पुरुष संघाने ४x४०० मीटर रिले शर्यतीत २:५९.०५ अशी वेळ नोंदवून आशियाई विक्रम मोडला. यापूर्वीचा विक्रम जपानच्या खेळाडूंच्या नावावर होता (२ मिनिटे ५९.५१ सेकंद). भारतीय संघाने अमेरिकेनंतर दुसरे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

अव्वल स्थानावर राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या अमेरिकेविरुद्ध भारताला हीट-१ मध्ये ठेवण्यात आले होते. अमेरिकन खेळाडूंनी ही शर्यत दोन मिनिटे ५८.४७ सेकंदात पूर्ण केली. भारत शर्यतीत ग्रेट ब्रिटन आणि बोत्सवानासारख्या संघांपेक्षा पुढे होता, ही कामगिरी आश्चर्यकारक होती. जमैका (२:५९:८२ सेकंद), फ्रान्स (३:००:०५ से.) आणि इटली (३:००:१४ से.) आणि नेदरलँड (३:००:२३ से.) यांनी हीट-२ मधून अंतिम फेरीत प्रवेश केला.

भारतासाठी मुहम्मद अनास याहियाने पहिल्या रनची सुरुवात केली. पहिल्या रननंतर तो ६व्या क्रमांकावर होता. मात्र, यानंतर अमोज जेकबने शानदार कामगिरी केली आणि दुसऱ्या रननंतर भारताला दुसऱ्या क्रमांकावर पोहोचवले. त्यानंतर महंमद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश यांनी ती लाखमोलाची आघाडी कायम राखली. राजेशने क्षणभरासाठी अमेरिकेच्या जस्टिन रॉबिन्सनला अँकर लेगमध्ये हरवले आणि स्टेडियममधील चाहते थक्क झाले.

नीरज चोप्रा गोल्ड मेडलसाठी मैदानात उतरणार

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला आतापर्यंत केवळ दोनच पदके जिंकता आली होती. २००३ मध्ये अंजू बॉबी जॉर्जने महिलांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकले. त्यानंतर भालाफेकपटू नीरज चोप्राने गेल्या वर्षी यूजीन येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले. यावेळी जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पदरात काही पदके येऊ शकतात. आज नीरज चोप्रा, डीपी मनू आणि किशोर जेना पुरुष भालाफेकच्या अंतिम फेरीत आपले आव्हान सादर करतील. त्याच वेळी, भारतीय संघ 4x400 मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत भाग घेणार आहे.

पुढील बातम्या