मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs WI Highlights : सुर्या-तिलक वर्माची तुफानी फलंदाजी, टीम इंडियाचं टी-20 मालिकेत धमाकेदार पुनरागमन

IND vs WI Highlights : सुर्या-तिलक वर्माची तुफानी फलंदाजी, टीम इंडियाचं टी-20 मालिकेत धमाकेदार पुनरागमन

Aug 08, 2023, 11:24 PM IST

    • IND vs WI 3rd T20 highlights : भारताने तिसरा T20 सामना जिंकला आहे. भारताने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. भारताने १७.५ षटकांत तीन गडी गमावून १६४ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने ८३ धावांची खेळी केली. तिलक वर्मा ४९ धावा करून नाबाद राहिला.
IND vs WI 3rd T20 highlights

IND vs WI 3rd T20 highlights : भारताने तिसरा T20 सामना जिंकला आहे. भारताने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. भारताने १७.५ षटकांत तीन गडी गमावून १६४ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने ८३ धावांची खेळी केली. तिलक वर्मा ४९ धावा करून नाबाद राहिला.

    • IND vs WI 3rd T20 highlights : भारताने तिसरा T20 सामना जिंकला आहे. भारताने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. भारताने १७.५ षटकांत तीन गडी गमावून १६४ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने ८३ धावांची खेळी केली. तिलक वर्मा ४९ धावा करून नाबाद राहिला.

India vs West Indies (IND vs WI) 3rd T20 : भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा ७विकेट राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघ ५ सामन्यांच्या मालिकेत कायम आहे. भारताच्या विजयानंतर मालिकेतील स्कोअर २-१ असा वेस्ट इंडिजच्या बाजूने आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या आणि भारताने तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

तत्पूर्वी, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ५ विकेट्सवर १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने १७.५ षटकांत तीन गडी गमावून १६४ धावा करून सामना जिंकला. वेस्ट इंडिजकडून ब्रेंडन किंगने ४२ आणि कर्णधार पॉवेलने १९ चेंडूंत तीन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद ४० धावा केल्या.

भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादवने तीन बळी घेतले.त्याच्याशिवाय अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

वेस्ट इंडिजच्या १५९ धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. भारतीय संघाला पहिला झटका ४० धावांच्या स्कोअरवर बसला. टीम इंडियाकडून पदार्पण सामना खेळत असलेल्या यशस्वी जैस्वालने २ चेंडूत १ धावा करून बाद झाला. त्याचवेळी शुभमन गिलने ११ चेंडूत ६ धावा केल्या. ३४ धावांवर २ विकेट गमावल्यानंतर भारतीय संघ संघर्ष करत होता, मात्र सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी शानदार भागीदारी करत त्यांना संकटातून बाहेर काढले.

सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी झाली. सूर्यकुमार यादवने ८३ आणि तिलक वर्माने नाबाद ४९ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत अल्झारी जोसेफने सर्वाधिक २ बळी घेतले. तर ओबेद मॅकॉयला एक विकेट मिळाली.

दरम्यान, या मालिकेत आता वेस्ट इंडिजने दोन आणि भारताने एक सामना जिंकला आहे. ही मालिका जिंकण्यासाठी भारताला उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. त्याचवेळी वेस्ट इंडिजला मालिका जिंकण्यासाठी एका विजयाची गरज आहे. या मालिकेतील उर्वरित दोन सामने शनिवार आणि रविवारी होणार आहेत.

पुढील बातम्या