मराठी बातम्या  /  क्रीडा  /  India vs Spain Hockey : विश्वचषकात भारताची धमाकेदार सुरुवात, पहिल्याच सामन्यात स्पेनचा २-० ने धुव्वा

India vs Spain Hockey : विश्वचषकात भारताची धमाकेदार सुरुवात, पहिल्याच सामन्यात स्पेनचा २-० ने धुव्वा

Jan 13, 2023, 08:56 PM IST

    • india beat spain hockey world cup 2023: ओडिशामध्ये सुरू असलेल्या हॉकी विश्वचषकात भारताने विजयाने सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने स्पेनचा २-० असा पराभव केला.
India vs Spain Hockey

india beat spain hockey world cup 2023: ओडिशामध्ये सुरू असलेल्या हॉकी विश्वचषकात भारताने विजयाने सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने स्पेनचा २-० असा पराभव केला.

    • india beat spain hockey world cup 2023: ओडिशामध्ये सुरू असलेल्या हॉकी विश्वचषकात भारताने विजयाने सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने स्पेनचा २-० असा पराभव केला.

india beat spain hockey world cup highlights: ओडिशामध्ये सुरू असलेल्या हॉकी विश्वचषकात भारताने विजयाने सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने स्पेनचा २-० असा धुव्वा उडवला. भारताकडून या सामन्यात अमित रोहिदास आणि हार्दिक सिंगने गोल केले. भारताचा दुसरा सामना आता १५ जानेवारीला (रविवार) बलाढ्य इंग्लंडशी होणार आहे. इंग्लंडने त्यांच्या पहिल्या सामन्यात वेल्सचा ५-० असा पराभव केला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

 या विजयासह टीम इंडियाने पूल डी मध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. यापूर्वी इंग्लंडने वेल्सचा ५-० असा पराभव केला होता. चांगल्या गोल फरकामुळे इंग्लंड पहिल्या स्थानावर आहे. टीम इंडियासाठी अमित रोहिदास आणि हार्दिक सिंगने दोन उत्कृष्ट गोल केले. अमित रोहिदासला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

भारताने सामन्याला संथ सुरुवात केली. पहिली ५ मिनिटे स्पेनने टीम इंडियाला चांगलेच थकवले, पण जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतसा भारताने सामन्यावर पकड मिळवण्यास सुरुवात केली. याचा फायदा टीम इंडियाला ११व्या मिनिटाला मिळाला. भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्याचे रुपांतर गोलमध्ये करता आले नाही. पुढच्याच मिनिटाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर मात्र, अमित रोहिदासने शानदार गोल करत टीम इंडियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर २६व्या मिनिटाला भारताने दुसरा गोल केला. हार्दिक सिंगने ४ खेळाडूंना चकमा देत जबरदस्त गोल केला. त्याचा हा गोल दीर्घकाळ स्मरणात राहील. या विश्वचषकात भारताचा हा पहिला मैदानी गोल (फील्ड गोल) आहे. हार्दिक स्पेनच्या सर्कलमधून चेंडू घेऊन पुढे जात होता. त्याला गोलपोस्टजवळ असलेल्या ललित उपाध्यायला चेंडू पास करायचा होता, पण चेंडू स्पेनच्या डिफेंडरला धडकला आणि गोलपोस्टमध्ये गेला. अशाप्रकारे हार्दिकने टीम इंडियाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही.

 

पुढील बातम्या