मराठी बातम्या  /  क्रीडा  /  India vs Japan Hockey Match : टीम इंडिया फायनलमध्ये, उपांत्य फेरीत जपानचा धुव्वा

India vs Japan Hockey Match : टीम इंडिया फायनलमध्ये, उपांत्य फेरीत जपानचा धुव्वा

Aug 11, 2023, 10:27 PM IST

    • India vs Japan Hockey Match : भारताने जपानला हरवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अंतिम सामन्यात मलेशियाला भिडणार आहे. मलेशियाने पहिल्या उपांत्य फेरीत कोरियाचा ६-२ असा पराभव केला.
India vs Japan Hockey Match

India vs Japan Hockey Match : भारताने जपानला हरवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अंतिम सामन्यात मलेशियाला भिडणार आहे. मलेशियाने पहिल्या उपांत्य फेरीत कोरियाचा ६-२ असा पराभव केला.

    • India vs Japan Hockey Match : भारताने जपानला हरवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अंतिम सामन्यात मलेशियाला भिडणार आहे. मलेशियाने पहिल्या उपांत्य फेरीत कोरियाचा ६-२ असा पराभव केला.

भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. चेन्नई येथे शुक्रवारी (११ ऑगस्ट) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने जपानचा ५-० असा पराभव केला. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

भारताकडून आकाशदीप सिंग (१९वे मिनिट), हरमनप्रीत सिंग (२३वे मिनिट), मनदीप सिंग (३०वे मिनिट), सुमित (३९वे मिनिट) आणि सेल्वम कार्ती (५१वे मिनिट) यांनी गोल केले. आता अंतिम सामन्यात भारताचा सामना मलेशियाशी होणार आहे. मलेशियाने आजच पहिल्या उपांत्य फेरीत कोरियाचा ६-२ असा पराभव केला.

भारत चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद जिंकणार?

जर भारतीय संघाने अंतिम सामन्यात मलेशियाविरुद्ध विजय मिळवला तर भारत चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावेल. तीन विजेतेपद जिंकून भारत आता पाकिस्तानसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. आता भारताला पाकिस्तानला मागे टाकण्याची संधी आहे. भारत-पाकिस्तान व्यतिरिक्त, केवळ कोरियाला ही स्पर्धा एकाच वेळी जिंकता आली.

या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानसह एकूण ६ संघ सहभागी झाले होते, त्यापैकी पाकिस्तान आणि चीनचे संघ बाद फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. ग्रुप स्टेजमध्ये सर्व संघांनी प्रत्येकी ५ सामने खेळले. 

भारतीय संघाने १३ गुणांसह अव्वल स्थानावर राहून उपांत्य फेरी गाठली. यादरम्यान भारताने पाकिस्तानचा ४-० असा पराभव केला. मलेशिया १२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याचवेळी कोरिया, जपान आणि पाकिस्तानचे समान ५-५ गुण होते. तर चीनला केवळ एक गुण मिळवता आला. कोरिया आणि जपान हे चांगल्या गोल फरकाच्या जोरावर उपांत्य फेरीत आले होते.

पुढील बातम्या