मराठी बातम्या  /  क्रीडा  /  टी-२० विश्वचषकासाठी संघात स्थान न मिळालेल्या संजू सॅमसनसाठी खुशखबर, मिळाले ‘या’ संघाचे कर्णधारपद

टी-२० विश्वचषकासाठी संघात स्थान न मिळालेल्या संजू सॅमसनसाठी खुशखबर, मिळाले ‘या’ संघाचे कर्णधारपद

Sep 16, 2022, 04:26 PM IST

    • India A Vs new zealand A : न्यूझीलंड अ संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. याचे नेतृत्व संजू सॅमसनकडे (sanju samson) सोपवण्यात आले आहे.
संजू सॅमसन

India A Vs new zealand A : न्यूझीलंड अ संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. याचे नेतृत्व संजू सॅमसनकडे (sanju samson) सोपवण्यात आले आहे.

    • India A Vs new zealand A : न्यूझीलंड अ संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. याचे नेतृत्व संजू सॅमसनकडे (sanju samson) सोपवण्यात आले आहे.

India A Vs New Zealand A : न्यूझीलंडचा अ संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड अ व भारत अ संघामध्ये २२ सप्टेंबरपासून ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऑल इंडिया सीनियर सिलेक्शन कमिटीने या संघाची निवड केली आहे आणि या संघाचे करर्णधारपद संजू सॅमसनकडे (Sanju Samson) सोपविण्यात आले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड न झालेल्या संजू सॅमसनसाठी ही निवड एक खुशखबरच आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

२२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेतील सर्व सामने चेन्नईमधील एम चिदंबरम स्टेडियमवर खेळवले जातील. दोन्ही संघांमध्ये पहिला एकदिवसीय सामना २२ सप्टेंबर, दुसरा सामना २५ तर तिसरा व अंतिम एकदिवसीय सामना २७ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. इंडिया ए संघात पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड़, कुलदीप यादव, नवदीप सैनी, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर  आणि संजू सॅमसन सारखे दिग्गज खेळाडू सामील आहेत. 

भारतीय अ संघ खालीलप्रमाणे -

पृथ्वी शॉ, अभिमन्यु ईश्वरन, ऋतुराज गायकवाड़, राहुल त्रिपाठी, रजत पटिदार, संजू सॅमसन (कर्णधार), केएस भरत, कुलदीप यादव, शाहबाज नदीम, राहुल चाहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकुर, उमरान मलिक, नवदीप सैनी आणि राज अंगद बावा.

विभाग

पुढील बातम्या