मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Tilak Varma : तिसऱ्या सामन्यात अर्धशतक हुकलं, तरीही तिलक वर्मानं मिळवलं खास यादीत स्थान

Tilak Varma : तिसऱ्या सामन्यात अर्धशतक हुकलं, तरीही तिलक वर्मानं मिळवलं खास यादीत स्थान

Aug 09, 2023, 11:45 AM IST

  • Tilak Varma equals Suryakumar Yadav : वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात एका धावेनं अर्धशतक हुकलेल्या तिलक वर्माला एका खास यादीत स्थान मिळालंय.

Tilak Varma

Tilak Varma equals Suryakumar Yadav : वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात एका धावेनं अर्धशतक हुकलेल्या तिलक वर्माला एका खास यादीत स्थान मिळालंय.

  • Tilak Varma equals Suryakumar Yadav : वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात एका धावेनं अर्धशतक हुकलेल्या तिलक वर्माला एका खास यादीत स्थान मिळालंय.

Ind vs West Indies 3rd T20 Match : तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा ७ गडी राखून पराभव करत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तिलक वर्मानं तिन्ही सामन्यात आश्वासक कामगिरी केली. तिसऱ्या सामन्यात त्याचं अर्धशतक एका धावेनं हुकलं, मात्र तरीही एक खास कामगिरी त्यांच्या नावावर नोंदली गेली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

गयाना इथं खेळल्या गेलेल्या सामन्यात रोव्हमन पॉवेलच्या (१९ चेंडू, ४० धावा) झंझावाती खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं भारतासमोर १६० धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारतानं १७.५ षटकांत हे लक्ष्य गाठून मालिका पराभव टाळला. कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे भारताच्या विजयाचे हिरो ठरले.

तिलक वर्मानं चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं ३७ चेंडूत ४९ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीच्या जोरावर टिळकनं एका खास यादीत स्थान मिळवलं आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी पहिल्या तीन डावात सर्वाधिक धावा करण्यात दीपक हुड्डा अव्वल आहे. त्यानं पहिल्या तीन डावात १७२ धावा केल्या आहेत. या यादीत तिलक वर्मा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यानं सूर्यकुमार यादवची बरोबरी केली आहे. या दोघांच्या नावावर प्रत्येकी १३९ धावा आहेत. तिसऱ्या क्रमांकावर गौतम गंभीर असून त्यानं १०९ धावा केल्या आहेत.

टी-२० च्या पहिल्या तीन सामन्यांत ३० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिलक वर्मा हा सूर्यकुमार यादव नंतर दुसऱ्या स्थानी आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तिलकनं २२ चेंडूत ३९ धावा केल्या. दुसऱ्या डावात ४१ चेंडूत ५१ धावा केल्या होत्या. तिसऱ्या डावात नाबाद ४९ धावा केल्या.

पहिल्या तीन डावात भारताकडून सर्वाधिक टी-२० धावा

दीपक हुडा - १७२

सूर्यकुमार यादव / तिलक वर्मा - १३९

गौतम गंभीर - १०९

पुढील बातम्या