मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs WI : टीम इंडिया बार्बाडोसला पोहोचली, जडेजाच्या या हटके पोस्टची तुफान चर्चा

IND vs WI : टीम इंडिया बार्बाडोसला पोहोचली, जडेजाच्या या हटके पोस्टची तुफान चर्चा

Jul 01, 2023, 06:30 PM IST

    • India vs West indies Test Series : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका १२ जुलैपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचे खेळाडू जडेजा, अश्विन आणि शार्दुल बार्बाडोसला पोहोचले आहेत.
ind vs wi ravindra jadeja

India vs West indies Test Series : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका १२ जुलैपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचे खेळाडू जडेजा, अश्विन आणि शार्दुल बार्बाडोसला पोहोचले आहेत.

    • India vs West indies Test Series : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका १२ जुलैपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचे खेळाडू जडेजा, अश्विन आणि शार्दुल बार्बाडोसला पोहोचले आहेत.

Ravindra Jadeja India vs West indies Test Series : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका १२ जुलैपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी-20 सामने खेळणार आहे. यासाठी भारताचे काही खेळाडू वेस्ट इंडिजला पोहोचले आहेत. रवींद्र जडेजाने एक फोटो शेअर केला असून या माध्यमातून त्याने बार्बाडोसला पोहोचल्याचे चाहत्यांना सांगितले आहे. जडेजाने रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूरसोबतचा फोटो शेअर केला आहे. यानंतर जडेजाच्या या फोटोवर अनेक मजेशीर कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

वास्तविक, जडेजाने नुकतेच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो अश्विन आणि शार्दुलसोबत दिसत आहे. जडेजाच्या या फोटोला जवळपास एक लाख लोकांनी लाईक केले आहे. बार्बाडोस विमानतळावर पोहोचल्यानंतर त्याने हा फोटो शेअर केला आहे. जडेजाच्या फोटोवर चाहते कमेंट करत आहेत. जडेजा, अश्विन आणि शार्दुल यांचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

जडेजा आणि शार्दुल हे भारताच्या एकदिवसीय संघाचादेखील भाग आहेत. भारतीय संघ १२ जुलैपासून डॉमिनिका येथे मालिकेतील पहिली कसोटी खेळणार आहे. मालिकेतील दुसरा सामना २० जुलैपासून खेळवला जाणार आहे. त्याचवेळी २७ जुलैपासून एकदिवसीय आणि ३ ऑगस्टपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.

भारताचा कसोटी संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

पुढील बातम्या