मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ashwin and Jadeja : अश्विन-जडेजाने इतिहास रचला, कसोटीत ५०० बळी पूर्ण, भज्जी-कुंबळेचे किती विकेट्स? पाहा

Ashwin and Jadeja : अश्विन-जडेजाने इतिहास रचला, कसोटीत ५०० बळी पूर्ण, भज्जी-कुंबळेचे किती विकेट्स? पाहा

Jul 24, 2023, 10:35 AM IST

    • Ashwin & Jadeja 500 test wickets : भारतीय फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळी पूर्ण केले आहेत. अश्विन आणि जडेजा ही जोडी हा आकडा गाठणारी दुसरी भारतीय जोडी आहे.
Ashwin & Jadeja 500 test wickets

Ashwin & Jadeja 500 test wickets : भारतीय फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळी पूर्ण केले आहेत. अश्विन आणि जडेजा ही जोडी हा आकडा गाठणारी दुसरी भारतीय जोडी आहे.

    • Ashwin & Jadeja 500 test wickets : भारतीय फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळी पूर्ण केले आहेत. अश्विन आणि जडेजा ही जोडी हा आकडा गाठणारी दुसरी भारतीय जोडी आहे.

ind vs west indies 2nd test day 4 : वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या माध्यमातून भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने इतिहास रचला आहे. जडेजा-अश्विन जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स पूर्ण केले आहेत. अश्विन आणि जडेजा ही जोडी कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळी घेणारी दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. याआधी अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग (anil kumble harbhajan vs ashwin jadeja) या जोडीने हा पराक्रम केला होता.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे दुसरी कसोटी सुरू आहे. स्ट इंडिजचा संघ भारताच्या ३६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत आहे. या कसोटीच्या शेवटच्या डावात आर अश्विनने चौथ्या दिवसअखेर २ बळी घेतले. अश्विनने वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेट आणि कर्क मॅकेन्झी यांच्या विकेट घेत रवींद्र जडेजासोबत ५०० विकेट्स पूर्ण केल्या. यादरम्यान अश्विनने २७४ आणि रवींद्र जडेजाने २६६ विकेट घेतल्या.

त्याचबरोबर अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग या जोडीने एकत्र खेळताना ५०१ कसोटी बळी घेतले होते. यामध्ये अनिल कुंबळेने २८१ आणि हरभजन सिंगने २२० विकेट घेतल्या. कुंबळे आणि हरभजन सिंग या जोडीने ५४व्या कसोटीत ५१ बळींचा आकडा गाठला, तर अश्विन आणि जडेजा या जोडीने ४९व्या कसोटीतच ५०० विकेट्स पूर्ण केले

कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारी भारतीय जोडी

अनिल कुंबळे (२८१) आणि हरभजन सिंग (२२०)- ५४ कसोटीत ५०१ बळी.

आर अश्विन (२७४) आणि रवींद्र जडेजा (२२६) – ४९ कसोटीत ५०० बळी.

बिशनसिंग बेदी (१८४) आणि बीएस चंद्रशेखर (१८४)- ४२ कसोटीत ३६८ विकेट्स.

अश्विन आणि जडेजाची आतापर्यंतची कसोटी कारकीर्द

अश्विनने आपल्या कारकिर्दीत ९३ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या १७६ डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने ४८६ विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने नोव्हेंबर २०११ मध्ये कसोटी पदार्पण केले होते. फलंदाजीत त्याने १३१ डावात ३११९ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे.

तर जडेजाने आतापर्यंत ६६ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या १२६ डावांमध्ये गोलंदाजी करताना जडेजाने २७३ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने २७४३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ३ शतके आणि १८ अर्धशतके केली आहेत.

पुढील बातम्या