मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ravindra Jadeja: जाडेजाचा नवा पराक्रम, माजी कर्णधार कपिल देवचा ३० वर्ष जुना विक्रम मोडला!

Ravindra Jadeja: जाडेजाचा नवा पराक्रम, माजी कर्णधार कपिल देवचा ३० वर्ष जुना विक्रम मोडला!

Jul 28, 2023, 01:11 AM IST

  • Ravindra Jadeja Record: रवींद्र जाडेजाने भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

IND vs WI ODI

Ravindra Jadeja Record: रवींद्र जाडेजाने भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

  • Ravindra Jadeja Record: रवींद्र जाडेजाने भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

Ravindra Jadeja Breaks Kapil Dev Record: वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या सामन्यात भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने नव्या विक्रमाला गवसणी घातली. या सामन्यात रवींद्र जाडेजाने उत्कृष्ट गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह रवींद्र जाडेजा एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. या मालिकेपूर्वी वेस्ट इंडीज विरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाच्या यादीत जाडेजा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्यासोबत ४१ विकेट्ससह संयुक्त तिसऱ्या स्थानावर होता. तर, कपिल देव ४३ विकेट्ससह अव्वल स्थानी होता.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात शेफर्डच्या रुपात जाडेजाने त्याची तिसरी विकेट मिळवली. या विकेट्ससह त्याने कपिल देव यांचा विक्रम मोडला. वेस्ट इंडीजविरुद्ध रवींद्र जाडेजाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.

Virat Kohli: किंग कोहलीचा एक हाती झेल, पाहून रोमारियो शेफर्ड शॉक; व्हिडिओ व्हायरल

 

वेस्ट इंडीजविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय विकेट्स:

१) रवींद्र जाडेजा- ४४

२) कपिल देव- ४३

३) अनिल कुंबळे- ४१

४) मोहम्मद शामी- ३७

५) हरभजन सिंह- ३३

कपिल देव यांचा आणखी एक विक्रम मोडण्यापासून जाडेजा ३ विकेट्स दूर आहे. परदेशात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० विकेट्स आणि १००० धावा करणारा जाडेजा पहिला खेळाडू ठरणार आहे. कपिल देव यांनी ही कामगिरी केली आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये जाडेजाने आतापर्यंत १ हजार १२५ धावा केल्या आहेत. मात्र, ५० विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी तो आणखी ३ विकेट्स दूर आहे.

विभाग

पुढील बातम्या