मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Jadeja-Kuldeep Yadav : जडेजा-कुलदीप जोडीने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी पहिलीच फिरकी जोडी

Jadeja-Kuldeep Yadav : जडेजा-कुलदीप जोडीने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी पहिलीच फिरकी जोडी

Jul 28, 2023, 10:45 AM IST

    • jadeja kuldeep yadav record : भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना ५ गडी राखून जिंकला. या सामन्यात जडेजा आणि कुलदीप यादव या फिरकी जोडीने एकूण ७ बळी घेतले.
ind vs wi odi

jadeja kuldeep yadav record : भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना ५ गडी राखून जिंकला. या सामन्यात जडेजा आणि कुलदीप यादव या फिरकी जोडीने एकूण ७ बळी घेतले.

    • jadeja kuldeep yadav record : भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना ५ गडी राखून जिंकला. या सामन्यात जडेजा आणि कुलदीप यादव या फिरकी जोडीने एकूण ७ बळी घेतले.

India vs West Indies 1st ODI : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ५ गडी राखून पराभव केला. गुरुवारी (२७ जुलै) ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी केवळ ११५ धावांचे लक्ष्य दिले होते.हे लक्ष्य टीम इंडियाने २२.५ षटकांत ५ विकेट गमावून पूर्ण केले. या विजयासह भारताने वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. उभय संघांमधील दुसरा वनडे सामना याच मैदानावर २९ जुलै (शनिवार) रोजी होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

एकाच डावात सर्वाधिक विकेट घेणारी स्पिनर जोडी

या सामन्यात कुलदीप यादवने ४, तर रवींद्र जडेजाने ३ विकेट घेतल्या. यानंतर आता जडेजा आणि कुलदीप ही भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिली डावखुरी फिरकी जोडी बनली आहे, ज्यांनी एकाच वनडेत ७ किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत.

या सामन्यात रवींद्र जडेजाने ६ षटकात ३७ धावा देत ३ बळी घेतले. त्याचवेळी जडेजाने फलंदाजी करत १६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या सामन्यात कुलदीप यादवने ३ षटकांच्या गोलंदाजीमध्ये २ षटके निर्धाव टाकली, तर ६ धावा देत ४ बळी घेतले.

जडेजाने मोडला कपिल देवचा विक्रम

कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केल्यानंतर रवींद्र जडेजाने एकदिवसीय मालिकेलाही अशाच पद्धतीने सुरुवात केली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३ विकेट्स घेऊन जडेजाने खास विक्रम केला आहे. जडेजा वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने या विक्रमात कपिल देवला मागे टाकले आहे.

आता जडेजा एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. जडेजाच्या नावावर ४४ विकेट्स आहेत, तर कपिल देव ४३ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे तर अनिल कुंबळे ४१ विकेट्ससह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पुढील बातम्या