मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Nicholas Pooran: निकोलस पूरनची ऐतिहासिक कामगिरी, भारताविरुद्ध 'हे' दोन विक्रम करणारा पहिला फलंदाज

Nicholas Pooran: निकोलस पूरनची ऐतिहासिक कामगिरी, भारताविरुद्ध 'हे' दोन विक्रम करणारा पहिला फलंदाज

Aug 07, 2023, 01:32 PM IST

  • Nicholas Pooran Records: भारताविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात निकोलस पूरनने खास विक्रमांना गवसणी घातली आहे.

Nicholas Pooran

Nicholas Pooran Records: भारताविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात निकोलस पूरनने खास विक्रमांना गवसणी घातली आहे.

  • Nicholas Pooran Records: भारताविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात निकोलस पूरनने खास विक्रमांना गवसणी घातली आहे.

IND vs WI 2nd T20: वेस्ट इंडीजचा विकेटकिपर निकोलस पूरन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच पार पडलेल्या मेजर लीग क्रिकेटच्या फायनलमध्ये निकोलस पूरनच्या वादळी खेळीच्या जोरावर एमआय न्यूयॉर्कने ट्रॉफी जिंकली. यानंतर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या टी-२० मालिकेत निकोलस पूरनने भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. पहिल्या दोन सामन्यात वादळी फलंदाजी करत वेस्ट इंडीजच्या संघाला विजय मिळवून देण्यात काम दिले. यासह त्याने दोन मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. भारताविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार आणि सर्वाधिक अर्धशतक ठोकणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

भारताविरुद्ध पहिल्या आणि दुसऱ्या टी-२० सामन्यात निकोलस पूरनने अनुक्रमे दोन आणि चार षटकार ठोकले. या कामगिरीसह तो भारताविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. भारताविरुद्ध टी-२० सामन्यात निकोलस पूरनने सर्वाधिक ३० षटकार मारले आहेत. यानंतर यादीत दासुन शनाका दुसऱ्या (२९ षटकार), ग्लेन मॅक्सवेल तिसऱ्या (२८ षटकार), एविन लुईस चौथ्या (२८ षटकार) आणि कायरन पोलार्ड २७ षटकारांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

Akash Chopra: हार्दिक पांड्याचा 'हा' निर्णय आकाश चोप्राला खटकला; अक्षर पटेलचं नाव घेत म्हणाला...

टी-२० क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक षटकार

१) निकोलस पूरन- ३० षटकार

२) दासुन शनाका- २९ षटकार

३) ग्लेन मॅक्सवेल- २८ षटकार

४) एविन लुईस- २८ षटकार

५) कायरन पोलार्ड- २७ षटकार

 

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके

१) निकोलस पूरन- ५ अर्धशतके

२) जोस बटलर- ४ अर्धशतके

३) क्विंटन डी कॉक- ४ अर्धशतके

४) कॉलिन मुनरो- ४ अर्दशतके

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात निकोलस पूरनच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडीजने सामना जिंकला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने २० षटकात ७ विकेट्स गमावून १५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजच्या संघाने दोन विकेट्स आणि ७ चेंडू राखून विजय मिळवला.

पुढील बातम्या